पंजाबमधील शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल पोचपावती

पंजाबमध्ये आजपासून ( दिनांक १ एप्रिल) गहू अन तांदळाच्या हमीभावाने खरेदीची प्रक्रिया सुरु झालीय. आम आदमी पक्षाच्या सरकारने शेती मालाच्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी एक निर्णय लागू केलाय. राज्यातील मंडयांमध्ये म्हणजेच कृषी उत्पादन बाजार समित्यांमध्ये होणारे व्यवहार पारदर्शक असायला हवेत, असा राज्य सरकारचा हेतू आहे. आता बाजार समित्यांत माल विकणाऱ्या शेतकऱ्यांना निर्धारित काळात डिजिटल पावत्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
State Government said it would issue digital sale receipts, also known as J Forms
State Government said it would issue digital sale receipts, also known as J Forms

पंजाबमध्ये आजपासून ( दिनांक १ एप्रिल) गहू अन तांदळाच्या हमीभावाने खरेदीची प्रक्रिया सुरु झालीय. आम आदमी पक्षाच्या सरकारने शेती मालाच्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी एक निर्णय लागू केलाय. राज्यातील मंडयांमध्ये म्हणजेच कृषी उत्पादन बाजार समित्यांमध्ये होणारे व्यवहार पारदर्शक असायला हवेत, असा राज्य सरकारचा हेतू आहे.

आता बाजार समित्यांत माल विकणाऱ्या शेतकऱ्यांना निर्धारित काळात डिजिटल पावत्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संबंधित शेतकऱ्यांच्या व्हाट्स ऍपवर या पावत्या पाठवण्यात येणार असून त्यांना जे. फार्म्स असं संबोधलं जाणार आहे. राज्यातील ९ लाख नोंदणीकृत शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.

शेतकऱ्याने बाजार समितीकडे आणलेला माल आडत्यांमार्फत खरेदीदाराकडे सोपवण्यात आला की त्या शेतकऱ्याला मोबाइलवर पावती उपलब्ध होणार आहे. यापूर्वी बाजार समितीत आपल्या विकल्या गेलेल्या मालाची पावती आडत्यांमार्फत शेतकऱ्यांकडे दिली जात होती.आता त्यांना या व्यवहाराची माहिती एका क्लिकसरशी पाहता येणार आहे. अगदी बाजार समितीच्या संकेतस्थळावरही ही पावती उपलब्ध असणार आहे. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षातील दोन्ही हंगामातल्या गहू अन तांदळाच्या हमीभावाने खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना अशा डिजिटल पावत्या दिल्या जाणार आहेत.

या डिजिटल पावत्यांवर यु क्यूआर कोड, वॉटरमार्क, स्वतंत्र ओळख क्रमांकही असणार आहे, त्यामुळे इथे बनावटगिरीला स्कोप असणार नाहीय. या जे फार्म्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वित्तीय यंत्रणांकडून कर्जही घेता येणार आहे. याशिवाय हमीभावाने खरेदी केलेल्या मालाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना त्याच दिवशी मिळतील, असा प्रयत्न करण्यात आल्याचं मुख्यमंत्री मान यांनी सांगितलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com