Ahmednagar News : पाऊस नसल्याने पेरण्याचे वेळापत्रक कोलमडलं ; अनेक भागात दुबार पेरणीचे संकट

Kharif Sowing News : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने उघडीप पडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस न पडल्याने पेरण्या रखडल्या असून शेतकरी त्रस्त आहेत.
Cow Farming
Cow FarmingAgrowon
Published on: 
Updated on: 

Kharif Season 2023 : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही पुरेसा पाऊस नाही. अपुऱ्या पावसावर काही भागांत खरिपाच्या पेरण्या, कापूस लागवड झाली असली, तरी आतापर्यंत अवघी पंचवीस टक्के पेरणी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने उडीप दिली. त्यामुळे खरीप पेरण्यातील अडथळे कायम आहेत.

Cow Farming
Soybean Seed : नगर जिल्ह्यात सोयाबीन बियाणांचा तुटवडा

पाऊस नसल्याने पेरण्या रखडलेल्या भागात शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. नगर जिल्ह्यात यंदा खरिपाचे ५ लाख ८० हजार ५०७ हेक्टर सरासरी क्षेत्र ६ लाख ४९ हजार ७३० हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. सरासरीपेक्षा जवळपास सत्तर हजार हेक्टर क्षेत्र जास्ती आहे. बाजरीचे क्षेत्र कमी, तर कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडदाचे क्षेत्र वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज होता. मात्र यंदा उशिराने पाऊस आला. त्यातही अजून अनेक भागांत पाऊस नसल्याने पेरण्याचे वेळापत्रक कोलमडत आहे.

Cow Farming
Kharif Season : नगरमध्ये खरिपात दहा टक्के बियाण्यांची विक्री

मूग, उडदाची पेरणी झाली नाही. त्या जागेवर सोयाबीन, कापूस, तूर पेरला जाईल असे वाटत असले, तरी त्यातही पावसाचे अडथळे येत आहेत. नगर जिल्ह्यातील ९७ महसूल मंडलांपैकी २५ महसूल मंडलांत आतापर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने पेरण्या झाल्या नाहीत. आतापर्यंत जेऊर, नागापूर, वाळकी, वाढेगव्हाण, वडझिरे, टाकळी, काष्टी, देवदैठण, कर्जत, भांबोरा, एरंडगाव, सात्रळ, ताहाराबाद, ब्राह्मणी, वांबोरी, संगमनेर, धांदरफळ, आश्‍वी, सिबलापूर, घारगाव, डोळासणे, पिंपरणे, श्रीरामपूर, बेलापूर, टाकळीभान या पंचवीस टक्के पेरण्या झाल्या असून, २० हजार हेक्टरपर्यंत कापूस लागवड झाली आहे.

सोयाबीन, बाजरीची अजूनही अल्प पेरणी होत आहे. त्यातच सोयाबीनची मागणी असलेल्या बियाण्यांची विक्रेत्यांनी कृत्रीम टंचाई निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सध्या अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसर, पश्‍चिम भागातील घाटमाथ्यावर जोरदार सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.