

Nagar Rain News : पाऊस सुरू झाल्यानंतर खरीप पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात बियाणांची विक्रीही सुरू झाली आहे. आतापर्यंत प्राप्त बियाणांनुसार दहा टक्के म्हणजे १० हजार ५०४ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे.
त्यात ६०७५ क्विटंल सोयाबीनच्या बियाणांची तर ६० हजारांपेक्षा अधिक कापसाच्या पाकिटांची विक्री झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात कापसाच्या लागवडी सुरू झाल्या असल्या तरी पेरण्याला मात्र फारसा वेग येईना.
जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा ६ लाख ३९ हजार ४३० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज गृहीत धरुन बियाणांची मागणी केली आहे. यंदा दहा ते बारा दिवस पाऊस उशिराने आल्यामुळे पेरण्यालाही उशीर झाला आहे.
त्यामुळे आतापर्यंत बियाणे, खते खरेदी करण्याबाबतही शेतकरी दुर्लक्ष करत होते. चार दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने बाजारात बियाणे खते, खरेदीला गर्दी होऊ लागली. ज्या भागात समाधानकारक पाऊस झाला त्या भागात कापसाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे.
यंदा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ७० हजार ५७० क्विटंल बियाण्यांची मागणी केली होती. त्यातील आतापर्यंत ५६ हजार ६९१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यातील १० हजार ५०४ क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. जिल्ह्यात खरिपात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर या पिकांचे क्षेत्र अधिक आहे.
आतापर्यंत सोयाबीनचे ३५ हजार ४७९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून त्यातील ६ हजार ०७५ क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. कापसाचे क्विंटलमध्ये ९५७ म्हणजे साठ हजारांपेक्षा अधिक बियाणे पाकिटांची विक्री झाली आहे. कापसाच्या लागवडीला सुरुवात झाली असली तरी अन्य पिकांच्या पेरण्याला मात्र फारसा वेग आलेला नाही.
अजूनही अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस नाही. मागणी असलेले सोयाबीनचे जवळपास नव्वद टक्के बियाणे उपलब्ध झाले आहे. पावसाला उशीर झाल्याने मूग, उडदाच्या बियाणे विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
बियाणे उपलब्धता आणि विक्री (क्विंटल)
भात - ३२१२ - २४७७
बाजरी- २७२४- ३०९
मका - ६३०६ - ४४३
तूर - १३८०- ७२
मूग- १०६१ - ६६
उडीद- ४५६१- १०२
सोयाबीन ३५४७९ - ६०७५
कापूस - १९७८- ९५७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.