Siddheshwar Factory : जुन्या चिमणीच्या सहाय्याने सिद्धेश्वर कारखाना उसाचे गाळप करणार

Solapur news : सोलापूरातील विमानसेवेला अडथळा ठरत असल्याने सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली. परंतु आधुनिक तंत्रज्ञान वापरून येत्या गळीत हंगामात कारखाना सुरू करण्यात येणार असल्याचे संचालक मंडळाने सांगितले.
Siddheshwar Factory
Siddheshwar Factoryagrowon
Published on
Updated on

Shri Siddheshwar Sugar Factory  : ‘‘शेतकऱ्यांनी संभ्रम करून घेऊ नये, कारखान्याच्या जुन्या चिमणीवर सिद्धेश्वर कारखाना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही मल्टिस्टेट कारखान्यांशी करार करून येथील अतिरिक्त ऊसही गाळप करू,’’ असे आश्वासन सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी दिले.

Siddheshwar Factory
Solapur Chimni : चिमणी नाही ओ, माझा संसार पडलाय, सिद्धेश्वर कारखान्याच्या महिला कामगाराने फोडला टाहो

कारखान्याची विशेष सभा झाली. या वेळी सर्व सभासदांनी काडादींवर विश्वास दाखवून त्यांच्या पाठीशी राहण्याचा एकमुखी निर्णय घेतला. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, दीपक आलुरे, भगवान भोसले, अमोल हिप्परगी, संजीवकुमार पाटील, आनंद तानवडे, सुरेश हसापुरे, इंदुमती अलगोंडा, अंबण्णा भांगे आदी उपस्थित होते.

Siddheshwar Factory
Solapur Chimney : सोलापूरची चिमणी अखेर मातीत, कशी पडली पहा video

काडादी म्हणाले, ‘‘कारखान्याची उभी असलेली चिमणी महापालिकेने पाडली. आता पुन्हा चिमणी उभारण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. शेतकरी हित समोर ठेवूनच कारखान्याचे काम केले. चिमणीचा विमानाला कधीच अडथळा नव्हता. पण सभासदांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला. एनटीपीसीच्या चिमणीकडे दुर्लक्ष केले आणि सिद्धेश्वरची चिमणी मात्र जाणीवपूर्वक पाडली. आपण कायम शेतकऱ्यांचा विचार केला. तरीही चुकीचे काही केले आहे, असे वाटत असेल, तर बाजूला होण्याची आपली तयारी आहे.’’

२५० रुपयांचा हप्ता देणार

‘‘कारखान्याला ऊस घालण्याबाबत ठाम रहा. उसाला सांभाळा. कारखान्यापासून दूर जाऊ नका. उसाचा दरही लवकरच ठरवू. चालू गळीत हंगामातील उसापोटी २५० रुपयांचा हप्ता या महिनाअखेरपर्यंत देणार आहे. तसेच पुढे आणखी ९० रुपयांचा एक हप्ता देऊ,’’ असे काडादी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com