sanjay Gandhi niradhar anudan scheme for all category people
sanjay Gandhi niradhar anudan scheme for all category peopleAgrowon

संजय गांधी निराधार अनुदान योजना

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असायला लागते.
Published on

योजनेचे नाव- संजय गांधी निराधार अनुदान योजना

लाभार्थी- सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.

लाभाचे स्वरूप- या योजनेंतर्गत पात्र होणाऱ्या कुटुंबात एक लाभार्थी असल्यास ६०० रुपये दर महिन्याला मिळतात. एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास ९०० रुपये दर महिन्याला इतके आर्थिक सहाय्य मिळते.

आवश्यक कागदपत्रे- या योजनेंतर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंग लोक, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांसारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा सुद्धा येतात. घटस्फोट प्रक्रियेतील किंवा घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित महिला, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी या सर्वांना या योजनेचा लाभ मिळतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असायला लागते. आणि २१००० रुपये पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक असते.

संपर्क- जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसील संजय गांधी योजना/ तलाठी कार्यालय

sanjay Gandhi niradhar anudan scheme for all category people
जलजीवन’ योजना दोन वर्षांत पूर्ण करा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com