जलजीवन’ योजना दोन वर्षांत पूर्ण करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
Utthav thakare
Utthav thakareAgrowon
Published on
Updated on

मुंबई : ‘‘प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षांत अधिक वेगाने ही योजना पूर्ण करावी, ’’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी (ता.१२) दिले.
राज्यात (State) ग्रामीण कुटुंबांना नळाने पाणी पुरविण्याचे ७१ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. वर्षा निवासस्थानी ‘जलजीवन मिशन’ आढावा बैठक झाली. या वेळी पाणी पुरवठा व स्वच्छता (Water supply and sanitation) मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार सीताराम कुंटे, सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशन अभियान संचालक हृषीकेश यशोद आदी उपस्थित होते.
उपस्थित होते.

Utthav thakare
जनतेची ताकद देशाला कळली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाकरे म्हणाले, ‘‘पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थापनाचा (water supply management) सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. ‘जलजीवन’मिशन अंतर्गत राज्यात पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित कामेही वेगाने पूर्ण करावीत. योजनांच्या देखभाल-दुरुस्तीवर विशेष भर द्यावा.’’
बनसोडे म्हणाले, ‘‘जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत घरगुती नळ जोडणीसह पुरेशा प्रमाणात निर्धारित गुणवत्तेसह पाणी (Water) पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.’’
राज्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह सर्वच यंत्रणांव्दारे पाणीपुरवठा योजनांची कामे वेगात सुरू असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. राज्यात ७१ टक्के ग्रामीण कुटुंबांकडे वैयक्तिक नळ जोडणी उपलब्ध करण्यात आली आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्र अग्रेसर
मंत्री पाटील म्हणाले, ‘‘पाणीपुरवठा (Water supply) योजना सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी या योजनांच्या देखभाल दुरुस्तीवर विशेषत्वाने भर देण्यात येत आहे. ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत राज्य अग्रेसर आहे. या अंतर्गतची कामे वेगाने पूर्ण होतील. घरगुती नळजोडणी, पाणी गुणवत्ता, (Water Quality) संस्थात्मक नळजोडणी व ‘हर घर जल’ गावे घोषित करण्याच्या उद्देशाने विशेष मोहिमही राबविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com