

गेल्या वर्षी भारताचे दूध उत्पादन २ हजार कोटी लिटर झाले आहे. असे असले तरी आरोग्याच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या ग्राहकांचा इतर प्राण्यांच्या दुधाकडे ओढा वाढल्याचे दिसत आहे. यामध्ये विशेषत: शेळी आणि उंटाच्या दुधाच्या मागणीत वाढ झाली आहे.
हेही वाचा - पीकविमा जागृतीसाठी केंद्र सरकार १ कोटी शेतकऱ्यांच्या दारी शेळी आणि उंटाच्या दुधाबाबत जागरूकता वाढत असून या प्राण्यांच्या दुधाला मागणीही चांगली आहे, असे अद्विक फूड्सचे संस्थापक हितेश राठी यांनी सांगितले. गेल्या सहावर्षापूर्वी सुरू झालेली अद्विक फूड्स ही कंपनी देशांतर्गत आणि परदेशी बाजारात शेळी, उंट आणि गाढवाचे दूध विकते. याबाबतचे वृत्त बिझनेसलाईनने दिले आहे. ऑटिझमग्रस्त मुलांसाठी उंटाचे दूध - उंटाच्या दुधाला त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी आणि विशेषत: स्वमग्न असलेल्या मुलांसाठी चांगली मागणी आहे. उंटाच्या दुधामुळे ऑटिझम ग्रस्त मुलांच्या वर्तनात सुधारणा होते. उंटाचे दूध हे नैसर्गिक इन्सुलिन असून मधूमेहासाठी उपयुक्त आहे. एकूणच उंटाच्या दुधात जीवनसत्त्वांचा भरपूर साठा असतो. तसेच टाईप १ मधूमेह असणाऱ्या मुलांनी उंटाचे दूध आहारात घेतले तर इन्सुलिन देण्याची गरज उरत नाही. डेंग्यूसारख्या आजारांमध्ये उंटापेक्षा शेळीच्या दुधाला जास्त मागणी असते.
दिल्लीसारख्या शहरांमध्ये डेंग्यूच्या उद्रेकादरम्यान १८०० ते २००० रुपयांपर्यंत शेळीच्या दुधाच्या किमती वाढल्या होत्या. पण ते दूध शेळीचेच असेल याची खात्री नव्हती. आणि याच उद्देशाने तीन वर्षांपूर्वी कंपनी शेळीच्या दूध विक्रीकडे वळाल्याचे राठी म्हणतात. गाढवांची संख्या घटली - गाढवाच्या दुधाचा प्रामुख्याने औषधींसाठी वापर केला जातो. बालरोगतज्ज्ञ कधीकधी गाढवाच्या दुधाची शिफारस करतात. कारण ते मानवी दुधाप्रमाणचे चांगले आहे. याशिवाय गाढवाच्या दुधाला त्याच्या वृद्धत्वविरोधी गुणधर्मांसाठी स्किन केअर उत्पादनांच्या उद्योगातून मागणी आहे. उंट आणि गाढवांची संख्या घटत असतानाच त्यांच्या दुधाबाबत जागरूकता वाढत आहे. त्या तुलनेत शेळ्यांची संख्या स्थिर आहे. २०१२ ते २०१९ दरम्यान करण्यात आलेल्या २० व्या पशुगणनेनुसार, उंटाची संख्या २.५२ लाखांवरून घटून १.४८ लाख इतकी राहिली आहे. तर याच कालावधित भारतात गाढवांची संख्या ७१ टक्क्यांनी घटून १.१२ लाख इतकी आहे. तर शेळ्यांची १३.५ कोटीपर्यंत घसरलेली संख्या १४.८९ कोटी झाली आहे. १८ व्या पशुगणनेत शेळ्यांची संख्या १४.०५ कोटी एवढी होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.