Onion Issue : महाराष्ट्रातला कांदा विक्रीसाठी तेलंगणात पाठवणार ; हर्षवर्धन जाधव

Haydrabad Onion Market : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तेलंगणामध्ये चांगला भाव मिळत असल्याने दिलासा मिळला आहे.
Onion Issue
Onion Issueagrowon

Harshvardhan Jadhav On Onion : गेल्या एका महिन्यांहून अधिक काळापासून बाजारात आवक वाढल्याने कांद्याचे दर पडले आहेत. कांद्याचे दर प्रतिक्विंटल ६८७ ते ७५० रुपयांपर्यंत खाली आल्याने लासलगाव (lalasgaon) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे (APMC) उपबाजार आवार विंचूर येथे संतप्त शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलाव बंद पाडले.

दरम्यान,बीआरएसचे राज्य समन्वयक  माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बाजार समित्यांमध्ये भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत पुढील आठवड्यात कांदा तेलंगणा राज्यात विक्रीसाठी नेण्याची घोषणा केली आहे.

Onion Issue
Onion Rate : कांद्याचे दर वाढेना आणि चाळीतला कांदा काही हलेना!

राज्यभरात कांद्याला दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग होत आहे. राज्यातील कांदा उत्पादन निराश असताना तेलंगणा राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला  प्रतिक्विंटल २ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा हैदराबाद बाजार समितीमध्ये १ हजा ८०० ते २ हजार रुपये इतका बाजारभाव 'मिळाल्याचे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

Onion Issue
Onion Market : महाराष्ट्रातला कांदा का चालला तेलंगणाला?

दरम्यान, बीआरआसचे नेते माजी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विंचूर येथे उपबाजार समितीला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील कांदा हैदराबाद बाजार समितीत विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था पुढील आठवड्यापासून केली जाणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी महाराष्ट्र राज्य सरकारवर हल्ला चढवला.  शिंदे-फडणवीस सरकार काही करत नसल्याने कांद्याला दर मिळत नाही. कांद्याला एकरी ६० ते ७० हजार रुपये एकरी खर्च येत असताना बाजारत मिळत असलेला भावामुळे वाहतूक आणि हमालीचा खर्च निघत नाही. यासाठी राज्य सरकारने तेलंगणा राज्याप्रमाणेच कांदा खरेदी करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com