Team Agrowon
मोठ्या कष्टाने पिकलेल्या कांदा राज्यभरातील बाजारपेठेत कवडीमोड भावात विकला गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे
खरीप हंगामाच्या तोंडावर बाजारात कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही.
महाराष्ट्रातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेट असलेल्या लासलगाव बाजार समितीत ७००-९०० रुपये कांद्याला भाव मिळत होता.
मालेगावतील एका शेतकऱ्याने मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कांदा फेकून देत आपला संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रातील शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत होते, त्यांना तेलंगणाच्या के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारने शब्द दिला होता कांदा फेकू नका, आम्ही तो विकत घेऊ.
तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत म्हणून कांद्याची पंधराशे रुपये इतक्या चढ्या दराने खरेदी सुरू केली आहे.
औरंगाबाद, नाशिक आणि इतर जिल्ह्यातील शेतकरी कांदा ट्रकमध्ये घेऊन तेलंगणाला रवाना झाले आहेत. तिथे चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.