Maharashtra Politics : अखेर ठरलं... अर्थ खातं अजित पवारांनाच, धनंजय मुंडेंकडे कृषी, तर सहकारचा भार वळसे पाटलांकडे?

Cabinet Portfolios Allotment : शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या खाते वाटपाचा घोळ मिटल्याचा दावा केला जात असून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे अर्थसह महत्वाच्या खात्यांचा कारभार सोपण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsagrowon
Published on
Updated on

NCP Political Crisis : राष्ट्रवादीमध्ये बंड करून सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांचे दहा दिवसांपासून खातेवाटप रखडले होते. अनेक बैठकांनंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार आणि धनंजय मुंडे यांना कृषी मंत्रालयाची जबाबदार देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Maharashtra Politics
Ajit Pawar : अजित पवार यांचे बंड

राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी बंड केले. त्यांना पक्षातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असून त्यांच्यासह ८ जणांन मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, १० दिवसांनंतरही खातेवाटप न झाल्याने बिनखात्याचे मंत्री म्हणूनच ते वावरत होते. सुरुवातीपासून राष्ट्रवादीचे नेते अर्थ, सहकार, कृषी या खात्यांसाठी आग्रही होते. परंतु शिवसेना आणि भाजपचे आमदारांचा विरोध होता.

Maharashtra Politics
Cabinet Decisions : अजित पवारांच्या शपथविधीनंतर पहिलीच मंत्रिमंडळ बैठक ; ग्रीन हायड्रोजन धोरणासह महत्वाचे निर्णय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सर्वात महत्त्वाचे अर्थ आणि गृह अशी दोन खाती होती. त्यापैकी अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती आहे. अर्थ खात्यासोबतच सहकार खातंही राष्ट्रवादीकडेच जाणार असून दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे त्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

तसेच वादग्रस्त विधाने आणि कारनाम्यांमुळे वारंवार अडचणीत सापडणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खाते राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्याकडे दिले जाणार असल्याचं बोलंल जात आहे. त्याचबरोबर महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय खातेही राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com