Kolhapur Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यात ११ पर्यंत २०.५९ टक्के मतदान, करवीर मतदार संघात सर्वाधिक मतदान

Kolhapur Voting : मतदानाची वेळ सकाळी ७ वाजता असली तरी याची प्रक्रिया पहाटे साडेपाचपासून सुरू झाली. पहिल्यांदा प्रत्येक केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्राची चाचणी घेण्यात आली.
Kolhapur Assembly Election
Kolhapur Assembly Electionagrowon
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवार (ता.२०) मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार लढती होणार असल्याने मतदानासाठी लोकांनी मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात १३ साखर कारखानदार रिंगणात असल्याने अनेक ठिकाणी साखर कारखानदार विरूद्ध साखर कारखानदार अशी लढत होत आहे. जिल्ह्यात सकाळी ११ पर्यंत २०.५९ टक्के मतदान झाले. तर सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात २६.१३ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात ३ हजार ४५२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे.

सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी टक्क्यात पुढीलप्रमाणे

२७१- चंदगड २२.०१, २७२- राधानगरी - २३.००, 273- कागल – २३.६८, २७४- कोल्हापूर दक्षिण – १७.५७, २७५- करवीर – २६.१३, 276- कोल्हापूर उत्तर – २०.७५, २७७- शाहूवाडी – १७.५२, २७८- हातकणगंले – १४.२५, २७९- इचलकरंजी – १९.७७, २८०- शिरोळ – २१.४३.

काटेकोर पालन करून मतदानास सुरूवात

मतदानाची वेळ सकाळी ७ वाजता असली तरी याची प्रक्रिया पहाटे साडेपाचपासून सुरू झाली. पहिल्यांदा प्रत्येक केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्राची चाचणी घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक प्रतिनिधीला मतदान चाचणी घेण्यात आली. प्रत्येक मतदारयंत्रावर ५० मतांची चाचणी घेऊन मतदानाला सुरुवात करण्यात आली.

Kolhapur Assembly Election
Kolhapur Suagrcane Season : सीमा भागातील ऊस कर्नाटकात जाण्याची भीती; कोल्हापूर विभागातील गळीत हंगामावर परिणाम

महाविकास आघाडी सत्तेत येईल

महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहण्याचे ठरवलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील जनतेला स्थिर सरकार हवं आहे, त्यामुळे गेल्यावेळी जसा घोडेबाजार झाला तसा घोडेबाजार यावेळी करता येणार नाही. विनोद तावडे यांच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी सुप्रिया सुळे, नाना पटोले यांच्या ऑडिओ क्लिप दाखवण्यात येत असल्याचे देखील सतेज पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com