Bhagwat Karad : आदिवासी विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवा : भागवत कराड

Tribal society : छत्रपती संभाजीगर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील आदिवासी समाजाच्या योजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी प्रशासनास निर्देश दिले.
Bhagwat Karad
Bhagwat Karad Agrowon
Published on
Updated on

Scheme for Tribal Community : छत्रपती संभाजीगर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील आदिवासींना घरकुल, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, सुविधांसोबतच आर्थिक विकासाच्या योजनांचा लाभ प्रशासनाने द्यावा, असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आदिवासी विभागाच्या आढावा बैठकीत दिले.

Bhagwat Karad
Vijchori : संभाजीनगर परिमंडलात ‘महावितरण’ने पकडल्या ३ हजार ३१९ वीजचोऱ्या

या बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर रोडगे, तहसीलदार सतीश सोनी, अप्पर तहसीलदार विजय चव्हाण, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक सुरेश पटवे यांच्यासह आदिवासींसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Bhagwat Karad
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत दमदार पाऊस

जिल्ह्यातील कन्नड, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर तालुक्यांमधील आदिवासींना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना रस्ते, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र स्मशानभूमी यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदिवासी विभाग व संबंधित तहसिलदारांना डॉ. कराड यांनी सांगितले.

आदिवासी पाड्यांवर घरकुल, वीज, पथदिवे, पिण्याचे पाणी, एकलव्य शाळा उपलब्ध करण्यासाठी आदिवासींसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन सुविधा उपलब्ध करण्याबाबत सांगितले. या सर्व सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून ५ कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्याचे व तो निधी आदिवासी विभागाला देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना डॉ. कराड यांनी सूचित केले. जास्तीत जास्त आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी निधी दिला जाईल. आदिवासी विभागाने योजनांची अंमलबजावणी करावी, असे कराड म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com