Vijchori : संभाजीनगर परिमंडलात ‘महावितरण’ने पकडल्या ३ हजार ३१९ वीजचोऱ्या

Mahavitaran News: संभाजीनगर परिमंडलात राबविली विशेष मोहीम
Mahavitaran
MahavitaranAgrowon
Published on
Updated on

Electricity Thieves : छत्रपती संभाजीनगर : वीजचोरी (Electricity Thieves) विरोधात छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ‘महावितरण’ (Mahavitaran) ने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जून महिन्यात राबविलेल्या विशेष मोहिमेत ३ हजार ३१९ जणांवर कारवाई करून २ कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे.

मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी वीजचोरीविरोधात नियमित कारवायांबरोबरच जूनमध्ये विशेष मोहीम राबविण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अभियंते व कर्मचाऱ्यांना दिले होते. ज्या विद्युत वाहिनीवर वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात इतर भागातील कर्मचाऱ्यांनीही भाग घेऊन एकाचवेळी कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते.

त्यानुसार परिमंडलातील प्रत्येक शाखेत जूनमध्ये पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात धडक मोहीम राबविण्यात आली. यात वीजचोरीच्या ३ हजार ३१९ प्रकरणांत कारवाई करण्यात आली. यात सुमारे २ कोटी रुपयांची वीजचोरीची बिले आकारण्यात आली.

ही बिले न भरल्यास वीजचोरांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. वीज चोरीचा संशय असलेले मीटर ताब्यात घेऊन त्याची ‘महावितरण’च्या मीटर टेस्टिंग लॅबमध्ये तपासणी केली जाते. त्यात काही फेरफार केल्याचे आढळल्यास ग्राहकाने जोडलेल्या वीजभारानुसार वीजचोरीचे निर्धारित बिल दिले जाते. तसेच दंड (कंपाऊंडिंग चार्जेस) आकारला जातो.

वीजचोरीचे निर्धारित बिल व दंडाची रक्कम भरण्यासाठी ग्राहकाला मुदत दिली जाते. तथापि, विहित मुदतीत ग्राहकाने बिल व दंड न भरल्यास त्याच्यावर विद्युत कायद्यातील तरतुदीनुसार पोलिसांत गुन्हा नोंदविला जातो.

Mahavitaran
Electricity Bill : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ६५० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत

वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा, असे आवाहन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com