हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी छोट्या शेतकऱ्यांना बळ देण्याची गरज 

कीडनाशक फवारणीपासून ते पिकांच्या मूल्यांकनापर्यंत सर्व गोष्टी ड्रोन्सच्या मदतीने होतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) आणि डिजिटल तंत्रज्ञान (Digital Technology)यासाठी निर्णायक भूमिका बजावेल, यासाठी तरुण पिढी पुढाकार घेईल, असा आशावाद मोदी यांनी व्यक्त केला आहे.
seed varieties
seed varieties
Published on: 
Updated on: 

हवामान बदलात (Climate change) तग धरून राहणाऱ्या पिकांची वाणे विकसित करून देशातील अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्यांचे हितसंबंध जोपासण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. 

इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अरीड ट्रॉपिक्सच्या (ICRISAT) कार्यक्रमात शनिवारी मोदी बोलत होते.  संस्थेच्या हवामान बदल संशोधन आणि विकास केंद्राचे उदघाटनावेळी त्यांनी ICRISAT च्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा आढावा घेतला.यावेळी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मोदी यांच्या हस्ते संस्थेच्या विशेष लोगो आणि स्टॅम्पचे अनावरण करण्यात आले. 

हवामान बदलाचा छोट्या शेतकऱ्यांवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अरीड ट्रॉपिक्स (ICRISAT) भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR ) या संस्थांनी पिकांमधील वैविध्यता व शाश्वततेसाठी काम करायला हवे, असे आवाहन करताना मोदी यांनी अर्थसंकल्पात (Budget 2022) याच विषयावर अधिक भर देण्यात आला असल्याचे नमूद केले. 

२०७० अखेरीस देशाने झिरो कार्बन उत्सर्जनाचे (net zero emissions) उद्दिष्ट्य साध्य करण्याचा संकल्प सोडल्याचे सांगताना मोदी यांनी, येत्या काळात कृषी क्षेत्राची वाटचाल ही डिजिटल तंत्रज्ञानाच्या (Digital Tecnology)मदतीने सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

व्हिडीओ पहा

कीडनाशक फवारणीपासून ते पिकांच्या मूल्यांकनापर्यंत सर्व गोष्टी ड्रोन्सच्या मदतीने होतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) आणि डिजिटल तंत्रज्ञान (Digital Technology)यासाठी निर्णायक भूमिका बजावेल, यासाठी तरुण पिढी पुढाकार घेईल, असा आशावाद मोदी यांनी व्यक्त केला आहे.        

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात वाढीव कृषी उत्पादनासह सर्वसमावेशक वाढीवर लक्ष्य केंद्रित करण्यात येत आहे. खाद्यतेल उत्पादनबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत असून ६.५ लाख एकर क्षेत्रात पाम ऑइल उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  

कापणीनंतरच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून ३५ दशलक्ष टन क्षमतेची कोल्ड स्टोरेज सुविधा उभारण्यात येत आहे. देशात बहुसंख्य असलेल्या अल्पभूधारक व छोट्या शेतकऱ्यांचे रूपांतर शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये करण्यावर लक्ष्य केंद्रित करण्यात येत असल्याचेही मोदी यांनी नमूद केले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.