Monsoon Rain
Monsoon RainAgrowon

Heavy Rain : मुंबईसह, कोकणात दमदार पाऊस

पावसाने जोर धरल्याने मुंबईसह कोकणात दमदार सरी कोसळत आहेत. दक्षिण कोकणात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
Published on

पुणे : पावसाने जोर धरल्याने मुंबईसह कोकणात दमदार सरी (Heavy Rainfall In Mumbai) कोसळत आहेत. दक्षिण कोकणात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. घाटमाथ्यावरील धारावी येथे सर्वाधिक २८० मिलिमीटर, तर मुंबईतील कुलाबा येथे २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप असून, तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. (Monsoon Rain)

किनारपट्टीला समांतर हवेच्या कमी दाबाचा पट्टा पोषक ठरल्याने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊन अतिवृष्टी झाली. तर मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. तर कोकण आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाने नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. भातखाचरेही तुडुंब झाल्याने भात लावणीच्या कामांना गती मिळणार आहे.

Monsoon Rain
Rain Update : दक्षिण कोकणात दमदार पाऊस

मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही पावसाला सुरूवात झाली आहे. गगनबावडा, महाबळेश्वर, लोणावळा, इगतपुरी भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भातही चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तर उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

शुक्रवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :
कोकण :
कुलाबा २३०, सांताक्रूज १७०, गुहागर, राजापूर, मालवण, लांजा प्रत्येकी १५०. रामेश्वर १२०, रत्नागिरी ११०, मुरूड, उरण, वसई, सावंतवाडी प्रत्येकी १००, देवगड, श्रीवर्धन, ठाणे प्रत्येकी ९०, दोडामार्ग ८०, दापोली, पेण, संगमेश्वर, वैभववाडी प्रत्येकी ७०, तलासरी, तळा, पनवेल, रोहा प्रत्येकी ६०.
....

मध्य महाराष्ट्र :
गगनबावडा, लोणावळा प्रत्येकी ६०, अक्कलकुवा, महाबळेश्वर प्रत्येकी ५०, इगतपुरी, धरणगाव प्रत्येकी ४०, पौड, वेल्हे, ओझरखेडा, पन्हाळा ३०.
....
मराठवाडा :
शिरूर अनंतपाळ ४०, भोकर ३०, लोहारा, आष्टी, हादगाव, माहूर, पाटोदा प्रत्येकी २०.
....
विदर्भ :
जेवती, कुही, बल्लारपूर, सेलू, देवळी प्रत्येकी ४०, मुलचेरा, लाखंदूर, सिरोंचा, सिंदेवाही, कोरपणा, चंद्रपूर, हिंगणा, कामठी, भिवापूर, आरमोरी, मूल प्रत्येकी ३०.
.....
घाटमाथा :
धारावी २८०, शिरगाव, दावडी, खोपोली ७०, डुंगुरवाडी, कोयना (पोफळी), भिरा प्रत्येकी ६०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com