Onion
OnionAgrowon

Onion Subsidy : परभणीतील कांदा उत्पादकांना अनुदान द्या ; किसान मोर्चाचे पणन मंत्र्यांकडे साकडे

Onion Farmers News: फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे दर पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले आहे.
Published on

Parbhani Onion News : परभणी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास बाबर यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

Onion
Onion Subsidy : कांद्याला अनुदान मिळणार तर कधी, शेतकऱ्यांची तीव्र नाराजी

परभणी जिल्ह्यात परवानाधारक कांदा खरेदीदार व्यापारी नाहीत. जिल्ह्यात ‘नाफेड’चे कांदा खरेदी केंद्र नाही. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारक यांच्यामार्फत कांदा खरेदी होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कांदा विक्री केला आहे. खासगी व्यापाऱ्यांना विकलेल्या कांद्याच्या अनुदानामध्ये उल्लेख नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सातत्याने आंदोलन करत पाठपुरावा केला.

Onion
Onion Subsidy : कांद्याला मिळणार ३५० रुपये अनुदान; अनुदानासाठी अर्ज कसा करावा?

पणन मंत्री सत्तार यांनी सभागृहामध्ये केलेल्या घोषणेनुसार, परभणी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला म्हणजे जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक यांना त्यादृष्टीने सूचना द्याव्यात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तपशीलवार माहिती संकलित करुन येत्या १५ ऑगस्टपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करावे, अशी मागणी विलास बाबर यांनी केली. या वेळी जगन्नाथ गोरे, संजय गोरे, हनुमान गोरे, बाबासाहेब वाघ, अंकुश माने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com