Onion Subsidy : कांद्याला अनुदान मिळणार तर कधी, शेतकऱ्यांची तीव्र नाराजी

State Government : राज्य सरकारने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिकिलो तीन रूपये ५० पैसे अनुदान जाहीर केले होते.
Onion Subsidy
Onion Subsidyagrowon
Published on
Updated on

Onion Price : मागच्या काही महिन्यांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने सरकारकडून अनुदान जाहीर करण्यात आले होते. दरम्यान राज्य सरकारने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिकिलो तीन रूपये ५० पैसे अनुदान जाहीर केले. दरम्यान याबाबत सरकारकडून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी याबाबत कागदपत्रे देऊनही त्यांच्या खात्यात अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील मंचर बाजारसमितीतील शेतकऱ्यांनी शासनाने कांदा अनुदान ताबडतोब शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी केली. फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये कांद्याचा भांडवली खर्चही निघत नव्हता.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. यावर उपाय म्हणून सरकारने बाजार समितीच्या आवारात विक्री केलेल्या कांद्याला प्रतिकिलो साडेतीन रुपये अनुदान तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत कांदा विक्रीसाठी पाठवलेल्या शेतकर्‍यांना शासनाने अनुदानासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावयास सांगितली होती. या कागदपत्रांची पूर्तता शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केली.

Onion Subsidy
Onion Seed : बार्शीत ‘लायन्स’कडून ५० शेतकऱ्यांना कांदा बियाणे

परंतु हे अनुदान अजूनही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. गेले तीन ते साडेतीन महिने शेतकरी वर्ग या अनुदानाच्या प्रतीक्षेत असून, कांद्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेले शेतकरी अनुदान न मिळाल्याने हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेले अनुदान शेतकर्‍यांना ताबडतोब द्यावे, अशी मागणी मंचर बाजार समिती उपसभापती सचिन पानसरे यांनी केली आहे.

याबाबत मंचर बाजार समितीचे माजी संचालक बबनराव मोरडे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ते म्हणाले की, राज्य सरकारमध्ये सध्या विविध घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सर्वांचेच लक्ष त्या घटनाक्रमाकडे लागले असून, सर्वच समाजमाध्यमे फक्त राजकीय विषयावर चर्चा करीत आहेत. अशावेळी समाजाचे अनेक प्रश्न मागे राहतात आणि तसाच कांद्याचाही प्रश्न मागे राहिला असून, यावर ताबडतोब मार्ग काढून शासनाने कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना कांद्याचे अनुदान द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com