अन् शेतकऱ्याने अस्वलच ठेवलं कामाला !

तेलंगणातील सिद्दीपेट जिल्ह्यातील भास्कर रेड्डी या शेतकऱ्याने शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी एक अनोखी युक्ती केली आहे. हा शेतकरी अस्वलाकडून आपल्या शेताची रखवाली करून घेत आहे.
Farmer Hired Bear
Farmer Hired Bear Agrowon

बऱ्याचदा वन्य प्राणी शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान करतात. रान डुकरे, जंगली माकडे यासारखे वन्यजीव पिकांची मोठ्या प्रमाणात नासधुस करतात. वन्य प्राण्यांपासून पिकं वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात खडा पहारा द्यावा लागतो. अनेकदा वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांवर हल्ले करण्यासारख्या घटनाही घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण (Wild Animal attack On Crop) कसं करावं हा प्रश्न पडतो. मात्र, तेलंगणातील एका शेतकऱ्याने जंगली जनावरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी चक्क एक अस्वलच कामाला ठेवलं आहे, असे सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण पिकांच्या रक्षणासाठी (Crop Protection) या शेतकऱ्यांनं आयडीयाची कल्पना शोधून काढली आहे. (Farmer Hired A Bear To Protect crop)

Farmer Hired Bear
जैविक उपाय वापरा, रानडुकरे पळवा !

तेलंगणातील सिद्दीपेट जिल्ह्यातील भास्कर रेड्डी (Bhaskar Reddy) या शेतकऱ्याने शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी एक अनोखी युक्ती केली आहे. हा शेतकरी अस्वलाकडून आपल्या शेताची रखवाली करून घेत आहे (Farmer Hired Man As A Bear). रेड्डी यांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी पाचशे रुपये रोजाने एका माणसाला कामावर ठेवले आहे. जो अस्वलाचा वेश परिधान करून शेताची रखवाली करतो.

शेतीच्या रखवालीसाठी अस्वल -

तेलंगाणाच्या सिद्दीपेट जिल्ह्यातील शेतकरी सध्या जंगली माकडे आणि रान डुकरांच्या दहशतीमुळे चांगलेच धास्तावले आहेत. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके रान डुकरे आणि माकडांनी उद्धवस्त केली आहे. शेतकऱ्यांना दिवसभर शेताची रखवाली करणे शक्य नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यावर भास्कर रेड्डी या शेतकऱ्याने एक अप्रतिम मार्ग शोधून काढला आहे. रेड्डी यांनी माकडे आणि रानडुक्करांना पळवून लावण्यासाठी पाचशे रुपये रोजाने एका माणसाला कामावर ठेवले असून त्याने अस्वलाचा वेश परिधान केला आहे. या नकली अस्वलाला पाहून माकडे आणि रानडुक्करे पळून जात आहेत. शेताची राखण करण्यासाठी शेतकऱ्याने केलेल्या कल्पनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com