पंढरपुर तालुक्यात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या, एका वासरु मृत्यूमुखी

पंढरपूर, जि. सोलापूर :दोन दिवसांपासून मगरवाडी, तुंगत, खरसोळी, फुलचिंचोली परिसरात बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याने धुमाकूळ घातला आहे. या प्राण्याच्या हल्ल्यात मगरवाडी व तुंगत येथील शेतकऱ्यांच्या तीन शेळ्या, फुलचिंचोली येथील कांबळे या शेतकऱ्याच्या जर्सी गाईचे लहान वासरु मृत्यूमुखी पडले आहे.
वन्य प्राण्याच्या पावलांचे ठसे
वन्य प्राण्याच्या पावलांचे ठसे
Published on
Updated on

पंढरपूर, जि. सोलापूर : दोन दिवसांपासून मगरवाडी, तुंगत, खरसोळी, फुलचिंचोली परिसरात बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याने  धुमाकूळ घातला आहे. या प्राण्याच्या हल्ल्यात मगरवाडी व तुंगत येथील शेतकऱ्यांच्या तीन शेळ्या, फुलचिंचोली येथील कांबळे या शेतकऱ्याच्या जर्सी गाईचे लहान वासरु मृत्यूमुखी पडले आहे.

तुंगत, मगरवाडी येथे रविवारी (ता.१०) मध्यरात्रीनंतर  बिबट्या सदृष्य वन्यप्राण्याने शेळ्यांची शिकार केली आहे. या घटनेनंतर  पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये  घबराट निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून  पूर्व भागात बिबट्याचा  संचार असल्याची शेतकऱ्यांमध्ये  चर्चा सुरु असतानाच रविवारी (ता.१०) रात्री तुंगत येथील शेतकरी राजू लामकाने यांच्या शेळीची शिकार या वन्य प्राण्याने केली. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री (ता.११)   मगरवाडी येथील दोन   शेतकऱ्यांच्या दोन शेळ्यांची बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याने  शिकार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापूर्वी फुलचिंचोली येथील कांबळे या शेतकऱ्याच्या जर्सी गाईच्या लहान वासराची शिकार करून ते खरसोळी येथील शेतकरी मोहन आसबे यांच्या उसाच्या शेतात टाकले होते. या प्रकारानंतर  या भागातील शेतकऱ्यांमध्ये  घबराट निर्माण झाली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर वन अधिकारी सुनिता  पत्की यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन वन्य प्राण्याच्या पायांचे  ठसे घेतले आहेत. मागील आठ दिवसांपासून टेंभूर्णी, परिते येथे बिबट्या आल्याची चर्चा आहे. अशातच रविवारी खरसोळी येथे बिबट्या दिसल्याची चर्चा होती. त्यानंतर सोमवारी मध्यरात्रीच्या (ता.११)  सुमारास मगरवाडी  येथील शेतकरी संजय नामदेव होमकुमरे आणि बबन होमकुमरे या शेतकऱ्यांच्या  तीन  शेळ्यांची  बिबट्या सदृष्य वन्यप्राण्याने शिकार केल्याने घबराट पसरली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com