सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २५ कोटींची मदत जाहीर : पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ३७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना तातडीची मदत मिळावी, या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्याकरिता २५ कोटींच्या मदतीची घोषणा केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
पालकमंत्री उदय सामंत
पालकमंत्री उदय सामंत
Published on
Updated on

सिंधुदुर्ग  ः निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ३७ लाख रुपयांचे नुकसान झाले  आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना तातडीची मदत मिळावी, या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्याकरिता २५ कोटींच्या मदतीची घोषणा केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर आदी उपस्थित होते. श्री. सामंत म्हणाले, निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करता यावी, यासाठी शासनाकडून कार्यवाही सुरू आहे. किनारपट्टीवरील मालमत्तेचे नेहमीच वादळामुळे नुकसान होते. वीज खांब, वीजवाहिन्यांचे सातत्याने नुकसान होत असते. त्यामुळे किनारपट्टी भागात भूमिगत केबल टाकण्याचे काम विचाराधीन होते. या कामाला आता शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.

या वेळी आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यात जरी ३७ लाखांचे नुकसान झाले असले तरी विजेचे खांब, बंधारे याशिवाय आपत्ती विभागांकरिता मोठ्या निधीची गरज होती. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांकडे २५ कोटींची मागणी केली होती.त्यामुळेच ही घोषणा करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com