Congress Protest : संभाजी भिडे यांच्या विधानाचा तीव्र पडसाद, काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन

Sambhaji Bhide on Mahatma Gandhi : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. भिडे यांच्या या विधानाचा निषेध करत राज्यभर जोरदार आंदोलन केलं आहे.
Congress Protest
Congress ProtestAgrowon

Sambhaji Bhide Controversial Remarks : अमरावती येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २८) रात्री उशिरा भिडे, अविनाश मरकल यांच्यासह आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Congress Protest
Amravati DCC Bank : कर्ज वितरणात अमरावती जिल्हा बॅंक आघाडीवर

अमरावती येथे आयोजित एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्याबाबत धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. या वक्तव्याविरोधात देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. अनेकांनी समाज माध्यमांद्वारे भिडे यांचा निषेध केला. अमरावती येथील स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २८) राजापेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, असे राजापेठच्या पोलिस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी सांगितले. या संदर्भात कायदेविषयक तज्ज्ञांचे मत घेऊन पुढील कारवाई केली जाईल. असेही त्यांनी सांगितले.

गुरुवारी (ता. २७) बडनेरा मार्गावरील सातूर्णा स्थित एका सभागृहात स्थानिक शिवप्रतिष्ठानच्या वतीने संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांच्यावर सामाजिक विद्वेष पसरविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यानंतर भिडे यांच्या भाषणाची ध्वनिचित्रफित तपासल्यावर ही कारवाई करण्यात आली. पावसाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला घेरले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com