सहकारी संस्था निवडणुकांची उद्यापासून रणधुमाळी

शासनाने कोविड विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया वेळोवेळी आदेश मंजूर करून पुढे ढकललेल्या होत्या.
Election
Election Agrowon
Published on
Updated on

पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या टप्प्यांतील तसेच २०२१ मधील ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत संपलेल्या एकूण १७ हजार १९४ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस शुक्रवार (ता. १)पासून सुरुवात होणार आहे. शासनाने कोविड विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया वेळोवेळी आदेश मंजूर करून पुढे ढकललेल्या होत्या. परंतु सद्यःस्थितीत निवडणूक स्थगित करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी समाप्त झालेला आहे.

राज्य सहकारी निवडणूक(State Co-operative Elections) प्राधिकरणाने दिनांक ३१ डिसेंबर २०२१ अखेर निवडणुकीस पात्र ४५ हजार ४०९ सहकारी संस्थांचा सहा टप्प्यांचा समावेश असलेला ‘जिल्हा निवडणूक आराखडा’ तयार केलेला आहे. तसेच ई-एक सन २०२१ व ई-१ सन २०२२ मध्ये अनुक्रमे १९ हजार ७५५ आणि १३ हजार ३२ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. प्राधिकरणाने ‘जिल्हा निवडणूक आराखड्यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे ३ हजार ९०५ व १३ हजार ९८ अशा एकूण १७ हजार ३ सहकारी संस्थांच्या निवडणूक (Elections) प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत.

Election
राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

तसेच तिसऱ्या टप्प्यातील इतर ९ हजार ९९ व उच्च न्यायालयाच्या (High-Court) आदेशानुसार ३१ मार्च २०२२ पर्यंत निवडणुकीस पात्र १५ हजार ३२० प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था अशा एकूण २४ हजार ४१९ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू केलेल्या असून, अशा एकूण ४१ हजार ४२२ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत.

पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांतील अनुक्रमे तीन हजार ७६७, सहा हजार ३९१ व बारा हजार ८९८ अशा एकूण २३ हजार ५६ सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. उर्वरित ज्या सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्राप्त झालेल्या आहेत अशा सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया तत्काळ प्रभावाने पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्राप्त झालेल्या नाहीत अशा सहकारी संस्थांवर प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबत संस्थेच्या निबंधकांना आदेश देण्यात आले आहेत. चौथ्या, पाचव्या, सहाव्या टप्प्यांतील व ई-१ सन २०२१ मधील १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील अनुक्रमे ४ हजार ५७१, तीन हजार ३७६, चार हजार ८३४ आणि चार हजार ४१३ अशा एकूण १७ हजार १९४ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्याचे निश्‍चित केलेले आहे. त्यानुसार अ वर्गातील ८९ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून, प्रामुख्याने ३० सहकारी साखर कारखाने व ४५ सूतगिरण्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहेत.

चार बँकांची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली
राज्यात ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (Co-operative) कार्यरत असून, त्यापैकी २१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने पूर्ण केलेल्या आहेत. शासनाने आर्थिक (Economy) परिस्थिती विचारात घेऊन नाशिक, सोलापूर, नागपूर आणि बुलडाणा या चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची (Bank) निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर पुढे ढकललेल्या आहेत. तर रायगड व जालना या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी २०२२ या ई-१ वर्षात निवडणुकीस पात्र असून, प्राधिकरणाने अद्याप सदर बँकांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू केलेल्या नाही. गोंदिया, भंडारा, आणि चंद्रपूर या ३ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब उच्च न्यायालय (High-Court) मुंबई (Mumbai) येथे न्यायप्रविष्ट आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या(Bank) निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने (High Court) स्थगिती आदेश पारीत केलेले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com