

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला पहिल्या टर्ममध्ये राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे अनेकवेळा कसरत करावी लागलेली आहे. महत्वपूर्ण विषयांवर संख्याबळ नसल्याने सावध भूमिका घ्याव्या लागलेल्या आहेत. आता मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये मात्र राज्यसभेतील भाजपच्या संख्याबळाचे चित्र पालटले आहे. भाजप खासदारांची संख्या ९७ वर होती, नुकतीच १३ जागासांठी निवडणूक पार पडली, त्यात भाजपचे ३ खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपने प्रथमच राज्यसभेत शतकी पल्ला गाठला आहे.
संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे (Rajya Sabha)तब्बल ७२ सदस्य एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या काळात निवृत्त होत आहेत. या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत, त्यामुळे राज्यसभेचे समीकरणही मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
गुरुवारी (दिनांक ३१ मार्च) राज्यसभेत (Rajya Sabha) निरोपाची भाषणे तर झालीच. पण संध्याकाळी राज्यसभेच्या उपसभापतींनी खास मैफिलीचेही आयोजन केले होते. कारण एकाचवेळी राज्यसभेचे ७२ सदस्य पुढच्या तीन महिन्यांत निवृत्त होत आहेत. जुलैपर्यंत जे ७२ खासदार निवृत्त होत आहेत. निवृत्त झालेल्या जागांसाठी निवडणूक होतील. त्यामुळे येत्या काळात रिक्त जागांवर आपले जास्तीत जास्त सदस्य निवडून देण्याची संधी भाजपला आहे, पाच राज्यांच्या सकारात्मक निकालामुळे भाजपला ते सहजशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे, त्यात महाराष्ट्रातल्या सहा खासदारांचा समावेश आहे. काँग्रेसचे पी. चिदंबरम, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत, भाजपचे पीयुष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे यांची राज्यसभेची टर्म ४ जुलैला संपत आहे.
साहजिकच महाराष्ट्रातल्या या ६ खासदारांपैकी पुन्हा राज्यसभेवर कोण निवडून येणार याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाकडून पुन्हा संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पीयुष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांचेही पुन्हा येणे निश्चित आहे. महाराष्ट्रात भाजपचे तीन खासदार निवृत्त होत आहेत, पण महाविकास आघाडीची विधानसभेतली ताकद एकत्र राहिली तर भाजपचे दोनच खासदार पुन्हा निवडून येऊ शकतात. त्यामुळे विकास महात्मे यांच्या परतीचा मार्ग कठीण आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.