Assam Flood News : आसाममध्ये पावसाचं थैमान, १० जिल्ह्यांत रेड अलर्ट, पूरात ३० हजार लोक बाधित

Red Alert In Assam : आसाम पूर आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला असून, 10 जिल्ह्यांतील 30 हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. पुरामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले आहे.
Assam Flood
Assam Floodagrowon
Published on
Updated on

Assam Rain Update : आसाममधील पूरस्थिती मंगळवारी अत्यंत भीषण राहिली, ज्यामुळे १० जिल्ह्यांतील सुमारे ३१ हजार लोक प्रभावित झाले. भारतीय हवामान विभागाने राज्यात 'रेड अलर्ट' जारी केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

गुवाहाटी येथील IMD च्या प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) 'स्पेशल वेदर बुलेटिन' मध्ये सोमवारपासून 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला, त्यानंतर पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट आणि गुरुवारी यलो अलर्ट जारी केला.

Assam Flood
Sikkim Rain Damage : सिक्कीमध्ये पावसाचा हाहाकार, विदेशी पर्यटकांसह २ हजारपेक्षा जास्त लोक अडकले

अतिवृष्टीमुळे सध्या ४४४ गावे पाण्याखाली आहेत आणि आसाममध्ये ४ लाख ७४१ हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये चिरांग, दररंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, कोक्राझार, लखीमपूर, नलबारी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांमधील पुरामुळे ३० हजार ७०० हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. त्यात म्हटले आहे की, लखीमपूर जिल्ह्यात २२ हजार हून अधिक लोकांसह सर्वात जास्त प्रभावित झाले आहे, दिब्रुगडमध्ये ३ हजार ८०० हून अधिक आणि कोक्राझारमध्ये सुमारे १ हजार ८०० लोक बाधित झाले आहे.

Assam Flood
Rain Update : पाऊस लांबला अन् पेरण्याही!

दिमा हासाओ, कामरूप महानगर आणि करीमगंजमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली. सोनितपूर, नागाव, नलबारी, बक्सा, चिरांग, दररंग, धेमाजी, गोलपारा, गोलाघाट, कामरूप, कोकराझार, लखीमपूर, दिब्रुगड, करीमगंज आणि उदलगुरी येथे बंधारे, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचेही पुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाले आहे.

कछार, दारंग, जोरहाट, कामरूप महानगर, कोक्राझार आणि नलबारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर आला. कांपूरमधील ब्रह्मपुत्रेची उपनदी कोपिलीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी पात्रानजीक राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com