Lumpy Virus : चाळीसगावात ‘लम्पी’चा हॉटस्पॉट

Lumpy Skin Diseases : खानदेशात लम्पी स्कीन आजाराची समस्या गोवर्गीय पशुधनात वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात एकट्या चाळीसगाव तालुक्यात सुमारे १०० पशुधन या आजाराने मृत्युमुखी पडले आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात लम्पी स्कीन आजाराची समस्या गोवर्गीय पशुधनात वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात एकट्या चाळीसगाव तालुक्यात सुमारे १०० पशुधन या आजाराने मृत्युमुखी पडले आहे. चाळीसगाव लम्पी स्कीनचा हॉटस्पॉट बनला असून, पशुधनपालक चिंतेत आहेत.

Lumpy Skin
Lumpy Virus : लम्पी स्कीनमुळे १५ दिवसांत ४२ हजार पशूधन बाधित ; तर ९०० जनावारांचा मृत्यू

खानदेशात ९५ टक्क्यांवर लम्पी संबंधीचे लसीकरण झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु हे लसीकरण आजार पसरल्यानंतर गतीने सुरू झाले. मागील जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातच लसीकरण पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु लसीकरण उशिरा सुरू झाले. जळगाव व धुळ्यात अनेक भागात जुलैत लशी प्राप्त झाल्या. जळगावात तीन लाख लशी जुलैत नऊ तालुक्यांसाठी प्राप्त झाल्या. पण याच काळात लम्पीची समस्याही चाळीसगावात प्रथम सुरू झाली. ऑगस्टमध्ये समस्या वाढत होती. पण त्यावर नियंत्रणच न आल्याने समस्या आता पूर्ण खानदेशात पसरली आहे.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, पारोळा भागात ही समस्या अधिक आहे. रावेर, जामनेर, यावल, चोपडा भागातही ही समस्या पोचली आहे. सर्व पशुधनाचे बाजार खानदेशात बंद झाले आहेत. तरीदेखील समस्या आटोक्यात येत नसल्याने पशुधनाची हानी किंवा मृत्यूचे प्रमाण सतत वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात १५० पशुधन मृत्युमुखी पडले आहे. धुळ्यातही २० पेक्षा अधिक पशुधन मृत्युमुखी झाले असून, नंदुरबारात ही संख्या अधिक आहे. कारण सातपुडा पर्वतात पशुधन अधिक आहे. या भागात यंत्रणाच पोचत नाही. तसेच लसीकरण व उपचार याबाबतही समाधानकारक स्थिती नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Lumpy Skin
Lumpy Disease Maharashtra : लम्पीचे थैमान, अधिकारी फोन उचलत नाहीत, मृत पशुधनांची आकडेवारी समोर

जळगाव जिल्ह्यात १८५० पेक्षा अधिक पशुधन लम्पी स्कीन आजारानेग्रस्त आहे. यात सध्या ५५० पशुधनावर उपचार सुरू आहेत. कमाल पशुधन आजारातून सावरत आहे. परंतु मृत्यूचे प्रमाण मात्र कमी होत नसल्याने यंत्रणेच्या उपाययोजना, उपचारांची पद्धत यावर प्रश्न तयार होत आहे. जळगावात भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर भागात मागील महिन्याच्या अखेरीस लम्पीची समस्या पोचली. ती वाढतच असल्याचे चित्र आहे. यंत्रणेकडे पुरेसे कर्मचारीबळ नाही. परिणामी उपचार संथ गतीने सुरू असून, खासगी पशुवैद्यक लुटालूट करीत आहेत. रोज एक ते दीड हजार रुपयांचा खर्च लम्पी स्कीनग्रस्त एका पशुधनावर पशुपालकांना खासगी पशुवैद्यकांकरवी उपचार करून घेताना येत आहे.

लम्पीचा विळखा वाढला आहे. परंतु प्रशासनाने खासगी पशुवैद्यकांची मदत घेऊन मोफत उपचार व इतर कार्यवाहीचा निर्णय घेतलेला नाही. यामुळे अडचणी वाढत असल्याचाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com