

सांगली ः द्राक्ष बागांवर नैसर्गिक संकटाची मालिका सुरू असून देखील द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गतवर्षी ४ हजार २८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यंदाच्या हंगामात ५ हजार ५३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीपेक्षा ७७० नोंदणीची संख्या वाढली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
द्राक्षाची युरोपियन युनियन तसेच इतर देशांना निर्यात व्हावी, यासाठी कृषी विभागामार्फत दर वर्षी निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात येते. त्या अंतर्गत या वर्षी १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ५३ निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी चार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.
सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि खानापूर या दोन तालुक्यांतून सर्वाधिक द्राक्षाची निर्यात होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी भागात असलेल्या जत तालुक्यासह कवठेमहांकाळ तालुक्यातून द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे येऊ लागले असल्याचे चित्र आहे.
यंदा द्राक्ष बांगावर नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट आले. त्यामुळे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु द्राक्ष उत्पादक शेतकरी काटेकोर नियोजन करत बागा वाचविण्यासाठीची धडपड करीत असल्याचे चित्र आहे. संकटांची मालिका सुरू असली, तरी जिल्ह्यातील शेतकरी द्राक्ष निर्यात करण्यासाठी कृषी विभागाकडे नोंदणी करीत आहेत. नैसर्गिक आपत्ती सारख्या संकटातही गत वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणीचा प्रतिसाद चांगला आहे.
सर्वाधिक नोंदणी तासगाव तालुक्यातून झाली आहे. तर द्राक्ष नोंदणीसाठी खानापूर तालुक्याचा दुसरा क्रमांक लागतो. आतापर्यंत ५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, द्राक्ष नोंदणीच्या संख्येत वाढ होईल, असा अंदाज देखील कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.