वानखेड, पातुर्डा येथे जलशक्ती अभियानाचा प्रचार

वानखेड व पातुर्डा येथे जलशक्ती अभियानाचा प्रचार
वानखेड व पातुर्डा येथे जलशक्ती अभियानाचा प्रचार
Published on: 
Updated on: 

बुलडाणा : भूजल पातळी खालावल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष निर्माण झाले. पाणी हेच जीवन आहे, या उक्तीवर आधारित जीवन जगण्याची पद्धती सुरू करण्याची गरज आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून केंद्र शासनाने सुरू केलेल्या जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून अनेकविध उपक्रमांमधून जलशक्तीचा जागर जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांत करण्यात येत आहे. त्यानुसार संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील श्री शिवशंकर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच गावामध्ये जलजागृतीचा संदेश देणारी रॅली काढण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक आर. ओ. राठी, सहायक शिक्षक पी. एन. नागोलकर, सहायक शिक्षिका एम. जी. सोळंके, सहायक शिक्षिका पी. के. जवंजाळ, सहायक शिक्षक एम. एच रौंदळे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पातुर्डा येथील जिल्हा परिषद शाळेत  रांगोळी स्पर्धा झाली. प्राचार्य एस. के देशपांडे, सहायक शिक्षिका व्ही. व्ही. पाठक, शिक्षिका सौ. पी. एच मानकर, सौ. आशा परेश पहुरकार, ममता संजय खांडे, मार्गदर्शक शिक्षक पी. एस. सपकाळ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com