कृषिपंप वीजजोडणीसह मागण्यांसाठी `स्वाभिमानी`चा आज मोर्चा

राजू शेट्टी
राजू शेट्टी
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर: कृषिपंपाची वीजजोडणी तातडीने द्यावी, वाढीव वीजबिले कमी करावीत आणि यंत्रमागधारकांसाठी वीजदरात सवलतीच्या मागणीसाठी सोमवारी (ता. १) शेतकऱ्यांसह कोल्हापूर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील तीनशेहून अधिक गावांमध्ये मी आणि पदाधिकाऱ्यांनी दौरे करून शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन केले असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. खासदार शेट्टी म्हणाले, की भाजपकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. अशा स्थितीत संघटना अधिक बळकट करून शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावणार आहे. शेती पंपाला त्वरित वीज मिळावी, यंत्रमागधारक, शेती पंप, घरगुती वीजबिलात झालेली वाढ रद्द करावी, शेती पंपाला १ रुपया प्रतियुनिटने वीज आकारणी करावी, कृषी पंपावर सत्यशोधन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, ग्रामपंचायतींचे स्ट्रीट लाइट विनाअट बसवा, ४२ लाख शेतीपंपाच्या वीजबिलाची दुरुस्ती करावी, शॉर्टसर्किटने जळीत झालेल्या उसाची नुकसानभरपाई द्यावी.  ‘‘कृषिपंपाला दिवसा १२ तास वीज द्यावी, दुर्गम भागात व डोंगरी वस्ती असलेल्या तसेच जंगली श्‍वापदांचा वावर असलेल्या ठिकाणी वीज कनेक्‍शनला प्राधान्य द्यावे, एच.व्ही.डी.एस.अंतर्गत असलेल्या २.५ ते ३ लाख रुपये खर्चाची अट रद्द करावी, २७ एच.पी.च्या आतील यंत्रमागधारकांना १ रुपये युनिटच्या सवलतीची अंमलबजावणी करावी व मल्टिपार्टी योजना राबवावी, यंत्रमागधारकांवरील वीज दरवाढ रद्द करावी, राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरणाची वीज सवलतीची अंमलबजावणी १५ फेब्रुवारी २०१८ पासून करावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढणार आहे,’’ असे खासदार शेट्टी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com