खानदेशात सूर्यफुलाची पेरणी वाढली

कमी कालावधी व बऱ्यापैकी दर देणारे पीक म्हणून खानदेशात यंदा सूर्यफुलाची पेरणी सुमारे ८० हेक्टरवर झाली आहे. गेले चार-पाच वर्षे अपवाद वगळता पेरणी होत नव्हती.
Sunflower sowing increased in Khandesh
Sunflower sowing increased in Khandesh

जळगाव ः कमी कालावधी व बऱ्यापैकी दर देणारे पीक म्हणून खानदेशात यंदा सूर्यफुलाची पेरणी सुमारे ८० हेक्टरवर झाली आहे. गेले चार-पाच वर्षे अपवाद वगळता पेरणी होत नव्हती.

कापूस पिकात गुलाबी बोंड अळीने धुमाकूळ घातला. त्यात मका पिकालाही लष्करी अळीने विळखा घातला आहे. मका पीक खर्चिक झाले आहे. तसेच गहू पिकाला अधिकचे पाणी द्यावे लागते. तर बाजरी, कांदा पिकात दरांची शाश्वती नाही. बाजरीला यंदा फक्त १३०० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. अशा स्थितीत धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील यावल, चोपडा, जामनेर या भागात काही शेतकरी सूर्यफुलाकडे वळले आहेत.

सूर्यफूल पेरणीत जळगाव, धुळे जिल्हा १५ ते १६ वर्षांपूर्वी आघाडीवर होते. परंतु कमी दर व इतर कारणांमुळे सूर्यफुलाची पेरणी कमी झाली. मध्यंतरी सूर्यफूल पेरणीची नोंदही दिसत नव्हती. परंतु अलीकडे आलेले चांगले वाण, दरांची हमी, सिंचनाची गहू, मक्याच्या तुलनेत कमी गरज व कमी खर्च यामुळे सूर्यफूल पेरणीला यंदा बरा प्रतिसाद दिसत आहे.

पेरणी धुळ्यातील शिरपुरात सुमारे २५ हेक्टरवर आहे. तसेच जळगावमधील चोपडा, यावल, जामनेरातही मिळून सुमारे ४० हेक्टर क्षेत्र आहे. तसेच इतर भागातही पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आगाप पेरणी केली आहे. मळणीनंतर ओल्या सूर्यफूल पिकास १० हजार रुपये दर मिळण्याची स्थिती सध्या आहे. एकरी किमान ४० ते ४५ हजार रुपये नफा सुटेल, असे चित्र सध्या आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com