

नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेल्या पांढुर्ली येथे सोमवार (ता. ३१) पासून उन्हाळ कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत. आवारात १ हजार गोण्यांची अशी एकूण ६०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल५०० ते २५००, तर सरासरी २००० रुपये दर मिळाले.
बाजार समितीचे सभापती लक्ष्मण शेळके यांच्या हस्ते लिलावाचा प्रारंभ करण्यात आला. येथे यापुढे दर सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी कांद्याचे लिलाव सुरू राहतील, असे बाजार समितीकडून कळविण्यात आले. कांदा खरेदी करण्यासाठी नंदु जाधव, अनिल हारक, बाळासाहेब दळवी आदी व्यापाऱ्यांनी लिलावात बोली देऊन शेतमाल खरेदी केला.
शेतकऱ्यांनी पांढुर्ली उपबाजार आवारात कांदा प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा, शेतीमालाची रक्कम व्यापाऱ्याकडून रोख स्वरूपात त्वरित लिलावाच्या दिवशीच ताब्यात घ्यावी, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले. या वेळी बाजार समितीचे माजी उपसभापती उत्तम माळी, सरपंच रमेश सकट, अनिल शेळके, अरुण वाजे, अरुण हारक, बाळासाहेब भोर इत्यादी उपस्थित होते.
शेतकरी खंडेराव वाघ, गणपत तुपे, शिवाजी तुपे, किरण पवार, कैलास वाजे, अनिल शेळके, शंकर रहाटळ, विठ्ठल गवळी, भाऊसाहेब मंडलिक, नामदेव वाजे, रतन जाधव, भाऊसाहेब वाजे आदी उपस्थित होते. बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव आर.एन.जाधव, इन्चार्ज आर. जे. डगळे, ए. बी. भांगरे यांनी शेतीमालाच्या लिलावाचे कामकाज पाहिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.