साखर उत्पादनात सोलापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. साखर उत्पादनात कोल्हापूरनंतर सोलापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोलापूर विभागात ३६ साखर कारखान्यातून २०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादनझाले आहे.
Solapur in sugar production Section second
Solapur in sugar production Section second
Published on: 
Updated on: 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. साखर उत्पादनात कोल्हापूरनंतर सोलापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोलापूर विभागात ३६ साखर कारखान्यातून २०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर विभागातील २६ सहकारी व १० खासगी साखर कारखान्यांनी २१९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २५६ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी उतारा ११.६७ टक्के मिळाला आहे. पुणे विभागातील १६ सहकारी व १३ खासगी साखर कारखान्यांनी १८८.९५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १९६ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. १०.४१ टक्के उतारा मिळाला आहे. 

सोलापूर विभागातील सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ सहकारी व ३० खासगी साखर कारखान्यांनी २२० मेट्रिक टन उसाचे गाळप करून २०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. उतारा ९.२५ टक्के मिळाला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यात ३३ साखर कारखान्यांनी १ कोटी ७४ लाख मे.टन उसाचे गाळप करून १ कोटी ६० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ९.१९ टक्के उतारा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com