साताऱ्यात सोसायट्यांच्या निवडणुकीचा ज्वर

सातारा : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुका सध्‍या सुरू आहेत. या निवडणुकीवर नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीचा ‘इफेक्ट’ मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.
Of societies in Satara Election fever
Of societies in Satara Election fever

सातारा : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुका सध्‍या सुरू आहेत. या निवडणुकीवर नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीचा ‘इफेक्ट’ मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. बिनविरोध होणाऱ्या अनेक सोसायट्या सुद्धा निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. 

अनेक सोसायट्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपुष्टात आला होता. मात्र, कोरोना संसर्गामुळे या सोसायट्यांना मुदतवाढ मिळाली. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यानंतर या सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरू झाला आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत काही मोजक्याच सोसायट्या बिनविरोध झाल्या आहेत. तर, जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा इफेक्ट सोसायट्यांच्या निवडणुकीवर झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी निवडणूक लागली आहे. बहुतांशी सोसायट्यांच्या ठिकाणी दुरंगी व चुरशीच्या लढती झाल्याचे दिसून आले. 

जिल्हा बँकेत सोसायट्यांचे महत्त्व काय असते? ते या निवडणुकीत दिसून आले. गावोगावी कार्यकर्ते सोसायटीवर आपलेच वर्चस्व मिळविण्यासाठी सतर्क झाले आहेत. शिवाय, तालुकापातळीवरील नेतेमंडळीदेखील सोसायटी निवडणुकीत लक्ष घालू लागली आहेत. तालुक्यातील सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तालुका, जिल्हास्तरावरील नेत्यांची या निवडणुकीत लक्ष घातले आहे. 

उमेदवारांकडून थेट शेतात जाऊन प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. या निवडणुकीत स्थानिक गट, तट यावरच निवडणूक लढविल्या जात आहेत. या निवडणुकीत संस्थेचे सभासद असल्याने यामध्ये मतदान करता येते. त्यामुळे ऐका मताचे निवडणुकीत महत्त्व मोठे असते. ग्रामीण भागात उष्णता वाढीबरोबरच राजकीय वातावरण देखील तापले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com