बाजरीच्या क्षेत्रात खानदेशात किंचित वाढ 

खानदेशात बाजरीच्या क्षेत्रात घट होईल, असे संकेत सुरवातीपासून मिळत होते. परंतु क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ३०० हेक्टरने वाढच झाली आहे. एकूण पेरणी साडेसात हजार हेक्टरवर झाल्याची माहिती आहे.
बाजरीच्या क्षेत्रात खानदेशात किंचित वाढ Slight increase in millet area in Khandesh
बाजरीच्या क्षेत्रात खानदेशात किंचित वाढ Slight increase in millet area in Khandesh
Published on
Updated on

जळगाव : खानदेशात बाजरीच्या क्षेत्रात घट होईल, असे संकेत सुरवातीपासून मिळत होते. परंतु क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ३०० हेक्टरने वाढच झाली आहे. एकूण पेरणी साडेसात हजार हेक्टरवर झाल्याची माहिती आहे.  गेल्या वर्षी पेरणी ७१८० हेक्टरवर झाली होती. यंदा पेरणी सुमारे ३०० हेक्टरने वाढली आहे. बाजरीचे दर गेल्या मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केल्यानंतर घटले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान दर कमाल १५०० रुपये प्रति क्विंटल एवढे होते. खरिपात पेरणी अत्यल्प झाली होती. खरिपातही दर कमाल १४०० रुपये प्रतिक्विंटल, असे मिळाले. दर कमी मिळाले. त्यामुळे शेतकरी बाजरीकडे वळणार नाहीत, क्षेत्र कमी होईल, अशी अटकळ होती.

परंतु पेरणी किंचित वाढली आहे, पिकेही जोमात आहेत.  पिकात कुठलीही फवारणी करावी लागली नाही. अनेक शेतकऱ्यांनी ठिबकवर पेरणी केली आहे. एकदा आंतरमशागत पूर्ण झाली आहे. तसेच तण नियंत्रणाचे कामही सुरू आहे. रासायनिक खतांचा पहिला डोस देण्यात आला आहे.

आणखी एक डोस आवश्यकतेनुसार निर्देशाप्रमाणे देण्याची तयारी शेतकरी करीत आहेत. कमी कालावधीचे पीक आणि चांगले उत्पादन यामुळे तापी, गिरणा नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत बाजरीची पेरणी झाली आहे. शिवाय चाराही कसदार मिळतो. अनेक कंपन्यांनी दर्जेदार व पक्ष्यांकडून दाणे फस्त होऊ शकणार नाहीत, असे वाणही बाजारात आणले आहेत.

मका, गहू पिकाच्या तुलनेत कमी खर्च व कमी कालावधी व अल्प पाणी लागत असल्याने बाजरीची पेरणी झाल्याचे शेतकऱ्यांसह कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. पिकात कुठेही लष्करी अळीचा प्रकोप झालेला नाही. यामुळे फवारण्यांची कटकट नाही, असे सांगण्यात आले. 

या ठिकाणी झाली पेरणी  जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर या भागात, तर धुळ्यात शिंदखेडा, साक्री, शिरपूर या भागात चांगली पेरणी झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातही नंदुरबार, नवापूर भागात पेरणी झाली आहे. तुलनेने नंदुरबारमध्ये पेरणी कमी झाली आहे. धुळ्यात मात्र सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com