स्वच्छ ग्रामस्पर्धेत सावळी ग्रामपंचायत अमरावती विभागात प्रथम

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील सावळी ग्रामपंचायतीने अमरावती विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.
Shadow in a clean village competition First in Gram Panchayat Amravati division
Shadow in a clean village competition First in Gram Panchayat Amravati division
Published on: 
Updated on: 

बुलडाणा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील सावळी ग्रामपंचायतीने अमरावती विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. या स्पर्धेत गेल्या चार वर्षांपासून अमरावती विभागातून ग्रामपंचायत प्रथम येत आहेत, हे विशेष. 

स्वच्छतेच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करून गावाने आपला विकास साधावा यासाठी संपूर्ण राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान गेल्या अनेक वर्षांपासून राबविले जात आहे. यामध्ये सन २०१९-२० या वर्षातील पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे पत्र जिल्हा परिषदेस नुकतेच प्राप्त झाले आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत जिल्ह्यातील बुलडाणा तालुक्यातून सावळी ग्रामपंचायतीने नेत्रदीपक कामगिरी करून अमरावती विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. विभागासाठी दहा लाख रुपये व प्रमाणपत्र असा पुरस्कार सावळी ग्रामपंचायतीस मिळणार आहे. आता सावळी ग्रामपंचायत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमासाठी २५ लाख रुपये व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.  याच स्पर्धेत बुलडाणा तालुक्यातील अजिसपूर ग्रामपंचायतीने सुद्धा सांडपाणी व्यवस्थापनात विशेष, असा स्व. वसंतराव नाईक पुरस्कार मिळवला आहे.  सावळी गावात ४०७ कुटुंबसंख्या व १८५० लोकसंख्या असून, ग्रामस्थांच्या एकजुटीने स्वच्छतेच्या क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. गावात प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालयाची सुविधा असून, त्यांचा नियमित वापर करतात. गावात दोन सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. गावात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीची स्वतंत्र घंटागाडी असून, त्याद्वारे नियमित कचरा संकलित केला जातो. गावातच कचरा डेपो, कंपोस्टपिट, गांडूळ खत प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत गावात भूमिगत गटारे असून, गावात कुठेही उघड्यावर सांडपाणी दिसत नाही. तसेच गावात शोषखड्डे, मॅजिक पिट, पाण्याचे स्थिरीकरण तळे, व्यायाम शाळा आर. ओ. प्रकल्प, गरम पाण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प, सुसज्य असे आरोग्य उपकेंद्र अशा उल्लेखनीय बाबी गावात आहेत. तसेच गावानेच लोकवर्गणीद्वारे गावातील प्राथमिक शाळा डिजिटल शाळा केलेली आहे. ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज हे पेपरलेस आहे. 

वेगळी ओळख तयार केली  सावळी व अजिसपूर या ग्रामपंचायतींनी केलेल्या कामगिरीमुळे बुलडाणा जिल्ह्याने स्वच्छतेच्या क्षेत्रात नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषाताई पवार व उपाध्यक्षा कमलताई बुधवत यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीसुद्धा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सावळी ग्रामपंचायतीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे. 

सावळी ग्रामपंचायतीची कामगिरी  - २०१७-१८ मध्ये तालुका स्तरावर स्मार्ट ग्राम  - सन २०१८-१९ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुकास्तरीय प्रथम व जिल्हास्तर द्वितीय  - सन २०१९-२० संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरावर द्वितीय 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com