

अकोलाः राज्य विधीमंडळाची रोजगार हमी योजना समिती सोमवार (ता.११) पासून जिल्हा दौऱ्यावर येत आहे. तीन दिवस ही समिती जिल्ह्यात विविध विकास कामांचा आढावा, प्रत्यक्ष भेटी देणार आहे. सोमवारी (ता. ११) सकाळी साडेऊ नऊ वाजता जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, पंचायत समिती सभापती यांच्याशी रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत चर्चा केली जाईल. सकाळी १० ते ११ या वेळेत जिल्ह्यातील जनतेकडून व स्वयंसेवी संस्थांकडून रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संदर्भाने प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांना भेटी देण्याबाबत जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. सकाळी ११ ते सायंकाळी सहापर्यंत रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांना भेटी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केले जाईल. मंगळवारी (ता.१२) कामांना भेटी व संबंधित अधिकाऱ्यासोबत चर्चा होईल. बुधवारी (ता.१३)रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत योजना राबविताना येणाऱ्या अडचणी, तसेच या संदर्भात समितीने पाठवलेली प्रश्नावली व समितीने कामांना दिलेल्या प्रत्यक्ष पाहणी भेटीत आढळलेल्या त्रुटींबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता (रोहयो), उपायुक्त(रोहयो), उपजिल्हाधिकारी (रोहयो) व ही योजना राबविणाऱ्या कार्यान्वयन यंत्रणेचे विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याबाबत बैठक होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.