बीड व औरंगाबाद विभागांतर्गत कापसाची २८ लाख ८९ हजार क्विंटल खरेदी

बीड : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या बीड व औरंगाबाद विभागांतर्गत जवळपास ६ जिल्ह्यांत २८ लाख ८९ हजार ५३० क्विंटल कापसाची हमी दराने खरेदी करण्यात आली.
Purchase of 28 lakh 89 thousand quintals of cotton
Purchase of 28 lakh 89 thousand quintals of cotton
Published on
Updated on

बीड : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या बीड व औरंगाबाद विभागांतर्गत जवळपास ६ जिल्ह्यांत २८ लाख ८९ हजार ५३० क्विंटल कापसाची हमी दराने खरेदी करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, महासंघाच्या बीड विभागाअंतर्गत बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कापूस खरेदी झाली आहे. बीड विभागात महासंघाच्या वतीने गत खरिपातील कापसाची खरेदी करण्यासाठी सुरुवातीला ६ केंद्रे सुरू केली. मागणीनुसार ती २९ वर पोहोचली. या सर्व केंद्रांच्या माध्यमातून शुक्रवार (ता.२४) पर्यंत एक लाख ५७ हजार ८३८ शेतकऱ्यांकडील १८ लाख १३ हजार ६०७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्यांपैकी केवळ १६००० क्विंटल कापसावर प्रक्रिया होणे बाकी आहे. 

दुसरीकडे १५ जूनपर्यंत खरेदी केलेल्या कापसाचे चुकारेही अदा करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू आहेत. उर्वरित खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे ही येत्या दहा ते पंधरा दिवसांत मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात येतील. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, नगर या जिल्ह्यांत नऊ केंद्रांतर्गत २२ जिनिंगसाठी कापूस खरेदी करण्यात आली. या केंद्रांवरून ३६ हजार ४९९ शेतकऱ्यांकडून १० लाख ७५ हजार ९२० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्यांपैकी केवळ ३ हजार २१५ क्विंटल कापसावर प्रक्रिया होणे बाकी आहे. 

२८ जूनपर्यंत खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे अदा करण्यात आले. आवक नसल्यात जमा असली, तरी महासंघाच्या औरंगाबाद विभागातील खामगाव फाटा, डोणगाव व श्रीरामपूर येथील केंद्रांवरील कापूस खरेदी झाली नसल्याचे महासंघाच्या सूत्रांनी सांगितले.

जिनिंगकडून पुढील हंगामाच्या तयारीच्या अनुषंगाने हालचाली सुरू आहेत. साधारणतः ऑक्टोबरच्या मध्यात आता पुढील हंगामातील कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या खरिपात वेळेवर कपाशीची लागवड झाली असल्याने पुढील हंगामाची तयारी जिनिंग कडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी नव्या जिनिंगही पुढील हंगामात कापूस प्रक्रियेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com