पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू राहणार

टाळेबंदीतही बाजार समितीमधील गर्दी कमी होत नसल्याने आता, बाजारातील गाळे आज, बुधवारपासून (ता.२१) ते ३० एप्रिलपर्यंत चक्राकार पद्धतीने (एक दिवसाआड) सुरू ठेवण्यात येणार आहे.
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू राहणार The Pune Market Committee will continue in a circular manner
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू राहणार The Pune Market Committee will continue in a circular manner
Published on
Updated on

पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे सुरू असलेल्‍या टाळेबंदीतही बाजार समितीमधील गर्दी कमी होत नसल्याने आता, बाजारातील गाळे आज, बुधवारपासून (ता.२१) ते ३० एप्रिलपर्यंत चक्राकार पद्धतीने (एक दिवसाआड) सुरू ठेवण्यात येणार आहे.

पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह बाजार आवाराला भेट देत गर्दी नियंत्रणाबाबत पाहणी केली. या वेळी विविध सूचना करण्यात आल्या. गर्दीवर नियंत्रण न मिळविल्यास बाजार समिती बंदचा देखील इशारा गुप्ता यांनी दिला आहे. 

कोरोना टाळेबंदीमध्ये गर्दी नियंत्रणासाठी बाजार समितीने विविध उपाययोजना केल्या. मात्र गर्दी काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र काही त्रुटींमुळे गर्दी होतच होती. त्यामुळे पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सोमवारी (ता. १९) बाजार आवाराला भेट देत पाहणी केली. या वेळी बाजार आवार एक दिवसाआड सुरू ठेवता येईल का? यावर चर्चा होऊन, संपूर्ण बाजार आवार बंद न करता गर्दी नियंत्रणासाठी एक दिवसाआड एक गाळा सुरू ठेवत चक्राकार पद्धतीने बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

असा सुरू राहील बाजार  वर्तुळाकार असलेल्या बाजार आवारात गणपती मंदिराकडे तोंड असलेले गाळे बुधवारी (ता.२१) तर दुसऱ्या दिवशी त्याच्या विरुद्ध असलेले संरक्षक भिंतींच्या दिशेला तोंड असलेले गाळे सुरू असतील.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com