

कोल्हापूर : सध्या राज्यात ऑक्सिजनची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने राज्यातील साखर कारखान्यांनी याची निर्मिती करण्याबाबतच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. तातडीने यंत्रणा उभारून ऑक्सिजन निर्मिती करणे अशक्य असले तरी सध्या असलेल्या काही प्रकल्पांमध्ये फेरफार करून किंवा काही उपकरणे विकत घेऊन त्यापासून छोट्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करण्याचे पर्याय सामोरे येत आहेत. किचकट प्रणालीपेक्षा सोप्या प्रणालीने तातडीने अमलात आणून त्याची कार्यवाही केल्यास ऑक्सिजनची निर्मिती तातडीने होवू शकेल, असा मत प्रवाह तज्ज्ञांचा आहे.
यंदा केंद्राने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने अनेक कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. यामुळे ज्या कारखान्यांकडे असे प्रकल्प आहेत त्यांच्याकडून मुबलक प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
‘व्हीएसआय’च्या तज्ज्ञांच्या मते ज्या कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प आहेत त्या कारखान्यांकडे जुजबी फेरफार करून काही प्रमाणात अतिरिक्त सामग्री बसविता येईल. मॉलीक्यूलर साइव्ह वापरून हवेतील वायूद्वारे ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करणे शक्य आहे. याद्वारे अंदाजे १० ते १५ टन प्रती दिन ऑक्सिजनची निर्मिती होऊन जवळपास दररोज एक हजार सिलिंडर पुरवठा होवू शकेल. सध्या अनेक कारखान्याकडे दैनंदिन साठ लाख किलो प्रती दिन इथेनॉल तयार करणारे प्रकल्प आहेत त्यापासून एक हजार सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होवू शकेल
व्हीएसआयकडून तातडीने पाठपुरावा शरद पवार यांनी सूचना केल्यानंतर साखर संघ, विस्मा व व्हीएसआच्या पुढाकाराने एक झूम बैठक झाली. या बैठकीस मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार, अशोक पवार, राष्ट्रीय संघाचे जयप्रकाश दांडेगावकर, विस्माचे बी. बी. ठोंबरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आदींसह खासगी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, व्हीएसआयचे शिवाजीराव देशमुख, तज्ज्ञ संजय पाटील आदी उपस्थित होते.
ऑक्सिजन युनिटची खरेदी शक्य काही परदेशी कंपन्या स्कीन माउटेड ऑक्सिजन युनिट उत्पादन करत आहेत. त्याची आयात करून मध्यम प्रमाणावर हवेतील वायूचा उपयोग करून ऑक्सिजन निर्मिती करता येईल. याद्वारे अंदाजे २ ते ५ टन प्रति दिन ऑक्सिजन निर्मिती होऊन ७ घन मीटर क्षमतेचे अंदाजे १०० ते २५० सिलिंडर दररोज पुरवठा होवू शकेल. अत्यंत छोटे सात ते दहा लिटर क्षमतेचे पोर्टेबल ऑक्सिजन कन्सेटॅक्टरर्स ज्याची किंमत ८० हजार रुपये आहे. त्याची आयात करून जंक्शनच्या माध्यमातून गरजू रुग्णांना त्याचा उपयोग करून घेता येईल. याबाबतीत बारामती अॅग्रोने पुढाकार घेऊन आयात केली आहे. या उपकरणांकरिता आठ कारखान्यांनी ५०० युनिटची मागणी कायम केली आहे. व्ही.एस.आय. साखर संघ, विस्माच्या माध्यमातून अधिक सहकार्य देण्यात येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.