ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव

पिकांवर फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असून शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात चांगलीच वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तजवीज करताना अडचणी येत आहेत.
Outbreaks of pests due to cloudy weather
Outbreaks of pests due to cloudy weather
Published on
Updated on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यातच थंडी वाढत असताना दाट धुके पडल्याने शेती पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. परिणामी, पिकांवर फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असून शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात चांगलीच वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तजवीज करताना अडचणी येत आहेत.

पुणे जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, गहू पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. सध्या अनेक ठिकाणी सकाळी उशिरापर्यंत धुके पडत आहे. त्यामुळे शेती पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगराई येण्याची शक्यता आहे. धुक्यांचा परिणाम पीक वाढीवरही होणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च करावा लागणार आहे. धुक्याचा फटका कांदा पिकालाही बसणार आहे. 

ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पिकांवरील कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला आहे. कांद्याच्या पातीवर पांढरे डाग पडल्याने होल पडले असल्याने उत्पादनापेक्षा फवारणी खर्च वाढल्याने शेती करायची कशी, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने सध्या कीटकनाशकांची फवारणीच्या कामात शेतकरी व्यस्त झाला आहे. सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे. 

भांडवली खर्चात वाढ  महागडी कीटकनाशके फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात वाढ होत आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, कांदापात, कोथिंबीर, मेथी, गवार या पिकांवर कीट, करपा, बोकड्या, आकसा, भुरी, मावा, तुडतुडे आदी रोग वाढले आहेत.

यंदा एक ते दीड एकरावर कांदा लागवड केली आहे. कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे मावा, करप्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. कांदा पीक वाचविण्यासाठी फवारणी करावी लागत असल्याने खर्चात वाढ होऊ लागली आहे. - नीलेश झेंडे, दिवे, कांदा उत्पादक शेतकरी, ता. पुरंदर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com