
सोलापूर ः श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रक्षाळ पुजेदिवशी गाभाऱ्यात अधिकाऱ्यांना अंघोळ घालण्याचा प्रकार घडला होता. त्याची गंभीर दखल घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. ही चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री विठ्ठल मंदिरात नऊ जुलैरोजी प्रक्षाळ पुजा आयोजिण्यात आली होती. त्यावेळी श्री विठ्ठलाला स्नान घालण्यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात अंघोळ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. मंदिर समितीतील जबाबदार अधिकाऱ्यांकडूनच असा प्रकार घडल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त होत होता. तसेच या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडसह भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे सदस्यांची बैठक पार पडली. त्यावेळी या विषयावर चर्चा झाली. मंदिरातील प्रथा, परंपरेला छेद देणाऱ्या या घटनेचा सर्वांनीच निषेध केला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईपर्यंत या अधिकाऱ्यांनी गाभाऱ्यात प्रवेश करु नये, मात्र, या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामात सहभाग घेता येईल, असा निर्णय या बैठकीत ठरला. या बैठकीला शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, सुजितसिंह ठाकूर, ज्ञानेश्वरमहाराज जळगावकर आदी सहभागी झाले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.