नीरा भीमा कारखान्याचे ६ लाख ४७ हजार टन गाळप

शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये गुरुवारी (ता.१७) ६ लाख ४७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करून कारखान्याच्या इतिहासात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
Of Neera Bhima factory 6 lakh 47 thousand tons threshing
Of Neera Bhima factory 6 lakh 47 thousand tons threshing

पुणे : शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये गुरुवारी (ता.१७) ६ लाख ४७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करून कारखान्याच्या इतिहासात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे, अशी माहिती अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली.  कारखान्याचा चालू २१वा गळीत हंगाम चालू असून अंतिम टप्प्यात आला आहे. कारखान्याने गुरुवारी स्वतःचा यापूर्वीच्या सर्व हंगामाचा ऊस गाळपाचा विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित केला. याबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.  कारखान्याने सहवीज निर्मिती प्रकल्पातून ३ कोटी युनिट वीज एक्सपोर्ट केली आहे. तसेच, इथेनॉल व इतर प्रकल्पही पूर्ण क्षमतेने उत्कृष्टपणे चालू आहेत. कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू गळीत हंगामामध्ये कारखाना ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे गाळप पूर्ण होईपर्यंत कारखाना चालू ठेवण्याच्या सूचनाही हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे गाळप केले जाणार आहे.  या वेळी संचालक विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रेय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जमादार, प्र. कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील तसेच के. एस. पाटील, पी. बी. पाटील, डी. एम. लिंबोरे आदी उपस्थित होते. 

सात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट  ‘‘शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने यापूर्वी २०१४-१५ च्या हंगामात ६ लाख ४६ हजार ९८५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. चालू हंगामात कारखान्याचे ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे,’’ असेही अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com