जालन्यात पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान

खडकपुर्णा धरणातून करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे धामणा नदीला आलेला पूर ओसरला आहे. सोमवारी (ता. १७) आलेल्या पुरामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
Major damage to crops due to floods in Jalna
Major damage to crops due to floods in Jalna
Published on: 
Updated on: 

जाफराबाद, जि. जालना : खडकपुर्णा धरणातून करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे धामणा नदीला आलेला पूर ओसरला आहे. सोमवारी (ता. १७) आलेल्या पुरामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार संतोष दानवे यांनी मंगळवारी (ता. १८) केली. यावेळी धामणा नदीकाठच्या गावात पुराच्या पाण्यामुळे आणि पावसामुळे झालेल्या पिकाचे आणि मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत, अशा सूचना आमदार दानवे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा परिषद सदस्य शालीकराव म्हस्के, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, कृषी मंडळ अधिकारी संतोष गायकवाड, नायब तहसीलदार केशव डकले, पंचायत समिती सदस्य साहेबराव कानडजे, जगन पंडित उपस्थित होते.

आमदार दानवे यांनी जाफराबाद तालुक्यातील बोरगांव, बोरी, हिवराबळी, पिंपळखुटा, रेपाळा या गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकरी आणि ग्रामस्थांसोबत चर्चा केली. धामणा काठच्या गावे बोरगांव बु., बोरी खुर्द, बोरगांव मठ, पिंपळखुटा, विरखेडा भालकी, रेपाळा, हारपाळा, मेरखेडा, हिवराबळी, देऊळगांव ऊगले, निमखेडा बु., देऊळझरी, बोरखेडी चिंच, कुंभारझरी, ब्रम्हपुरी, आळंद, हनुमंतखेडा येथील शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, कपाशी, मिरची, मूग, उडीद, अद्रक, हळद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पुरामुळे नुकसान झालेल्या बारा गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक, आणि कृषी साहाय्यक यांचे पथकामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली. पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील नद्या, नाले, तुडुंब भरून वाहू लागले. सोमवारी (ता. १७) धामणा नदीला आलेल्या पुराने बोरगांव, बोरी, हिवराबळी गावाला वेढा घातला होता. खबरदारी म्हणून बोरगांव आणि बोरीच्या ३५ कुटुंबांना शाळेत हालविण्यात आले आहे.

तर माहोरा कोल्हापूर रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने आणि पिंपळखुट्या जवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद होती. उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, नायब तहसीलदार केशव डकले यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश गवळी यांनीही केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com