खानदेशात मक्याची लागवड सुरू

जळगाव : खानदेशात रब्बी हंगामात मक्याची लागवड सुरू झाली आहे. यंदा क्षेत्र गेल्या हंगामाच्या तुलनेत सुमारे पाच ते सहा हजार हेक्टरने वाढू शकते. रब्बीची पेरणी १०० टक्क्यांपेक्षा अधिक होईल.
 Maize cultivation started in Khandesh
Maize cultivation started in Khandesh
Published on
Updated on

जळगाव : खानदेशात रब्बी हंगामात मक्याची लागवड सुरू झाली आहे. यंदा क्षेत्र गेल्या हंगामाच्या तुलनेत सुमारे पाच ते सहा हजार हेक्टरने वाढू शकते. रब्बीची पेरणी १०० टक्क्यांपेक्षा अधिक होईल. ही पेरणी एकूण चार लाख हेक्टरपर्यंत होईल, असा अंदाज आहे. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच लाख हेक्टरवर पेरणी होईल. जळगावात तब्बल ७० ते  ८० हजार हेक्टरवर मका लागवड होईल. ही लागवड पूर्वहंगामी कापसाखाली रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रात अधिक होईल. ही लागवड जळगाव, धुळ्यात सुरू झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, यावल, जामनेर, रावेर या तालुक्यात मका लागवड अधिक होईल. रावेर तालुक्यात जुनारी (काढणी पूर्ण झालेल्या केळी बागा) बागांमध्ये मका लागवड होईल. हरभरा व मक्याचे क्षेत्र जळगाव जिल्ह्यात सारखेच असू शकते, असाही अंदाज आहे. 

धुळ्यात सुमारे १८ ते २० हजार हेक्टरवर आणि नंदुरबारातही सुमारे आठ ते १० हजार हेक्टरवर मका लागवड होईल. अर्थातच खानदेशात मक्याचे क्षेत्र एक लाख हेक्टरपर्यंत अपेक्षित आहे. मक्याचे दर गेल्या हंगामात कमी होते. यामुळे काही शेतकरी मक्याऐवजी हरभऱ्याची पेरणी करीत आहेत. 

अनेक कृत्रीम जलसाठाधारक शेतकरी काबुली हरभरा पेरणी करीत आहेत. या हरभऱ्याला गेल्या हंगामात प्रतिक्विंटल चांगले दर मिळाले होते. तर, काही शेतकरी देशी प्रकारच्या हरभऱ्याची पेरणी करीत आहेत. पेरणीला या आठवड्यात सर्वत्र वेग आला आहे.

१५ टक्के झाली पेरणी 

दिवाळीपूर्वी हरभऱ्याची पेरणी खानदेशात बऱ्यापैकी होईल. कृषी विभागातर्फे आकडेवारी जाहीर केली जात असून, खानदेशात सुमारे १५ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. पुढील या आठवड्याच्या सुरवातीला या टक्केवारीत मोठी वाढ झालेली दिसेल, असे सूत्रांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com