सोलापुरातील एकवीस खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

सोलापूर : कृषी सेवा केंद्र चालकांना अनुदानित खत पॉस मशिनवर नोंदणी करून विकणे बंधनकारक आहे, परंतु, काही केंद्र चालकांनी याचा भंग केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.
 Licenses suspended of 21 fertilizer sellers in Solapur
Licenses suspended of 21 fertilizer sellers in Solapur
Published on: 
Updated on: 

सोलापूर  : कृषी सेवा केंद्र चालकांना अनुदानित खत पॉस मशिनवर नोंदणी करून विकणे बंधनकारक आहे, परंतु, काही केंद्र चालकांनी याचा भंग केला आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील २१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. 

शासन अनुदानित खतांची विक्री करीत असताना शेतकऱ्यांना पॉस मशिनवर अंगठ्याचा ठसा नोंदवून खते मिळत होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अंगठा नोंदविण्याऐवजी आधार क्रमांक पॉस मशिनवर नोंदवून खते देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. काही कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना खते देताना त्यांच्या आधार क्रमांकाऐवजी इतरांच्या नावाने पॉस मशिनवर नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. 

खतांच्या वितरणामध्ये कोणतीही अनियमितता झालेली नाही, मात्र पॉस मशिनवर नोंदणी व्यवस्थित न केल्याने २१ कृषी सेवा केंद्र चालकांचा अहवाल उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठवला होता. त्यानुसार २१ परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती कृषि विभागाकडून देण्यात आली.

तालुकानिहाय निलंबित परवाने

पंढरपूर तालुक्‍यातील सात, दक्षिण सोलापुरातील दोन, माळशिरसमधील एक, बार्शीतील एक, माढ्यातील पाच, उत्तर सोलापुरातील एक आणि मंगळवेढा तालुक्‍यातील चार परवाने निलंबित केले आहेत.

शेतकऱ्यांनी कोणतेही अनुदानित खत खरेदी करताना कृषी सेवा केंद्रांकडे आपला आधार क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. दर महिन्याला प्रत्येक तालुक्‍यातील सर्वात जास्त खते खरेदी करणाऱ्या खरेदीदारांची शहानिशा होणार आहे. यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील. - रवींद्र माने, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com