औशात सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करा : मुख्यमंत्र्यांचे रामदेवबाबांना पत्र

औशात सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करा : मुख्यमंत्र्यांचे रामदेवबाबांना पत्र
औशात सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करा : मुख्यमंत्र्यांचे रामदेवबाबांना पत्र
Published on: 
Updated on: 

लातूर  : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या औसा येथे पतंजली उद्योग समूहाचा सोयाबीनवर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करावा, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पतंजली उद्योग समूहाचे प्रमुख स्वामी रामदेवबाबा यांना दिले. दुसरीकडे याच तालुक्यात टेंभी परिसरात भेलच्या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली १८० हेक्टर जमीन एमआयडीसीकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या उद्योगासाठी ही जमीन उपलब्ध करून देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पतंजलीचा उद्योग सुरू झाल्यास तालुक्याचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. 

मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार औसा विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना हिरवा कंदील दिल्याची चर्चा सुरू आहे. यातून गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी या मतदारसंघात विविध खात्याच्या माध्यमातून दीडशे ते पावणे दोनशे कोटींच्या योजना मंजूर करून आणल्या आहेत. विकास कामाचा धडाका लावल्याने मतदारसंघातील अनेक गावांनी ठराव घेऊन पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. 

औसा तालुक्यात मोठा उद्योग यावा, यासाठी ते गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत. यात औसा तालुक्यात टेंभी परिसरात भेलचा प्रकल्प उभारण्यासाठी आठ वर्षांपूर्वी जागा संपादित करण्यात आली. पण पुढे हा प्रकल्प होऊ शकला नाही. पण जागा मात्र शासनाकडे आहे. ही जागा आता एमआयडीसीकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातून चार दिवसांपूर्वीच एमआयडीसीच्या राज्य पातळीवरील एका पथकाने या जागेची पाहणीही केली. 

रामदेवबाबा यांनी राज्यात एक मोठा प्रकल्प उभारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातून काही दिवसांपूर्वी त्यांची फडणवीस यांची भेट होऊन चर्चाही झाली आहे. त्यानंतर हा प्रकल्प औशात व्हावा, याकरिता पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला. यातून २६ जून रोजी फडणवीस यांनी स्वामी रामदेवबाबा यांना पत्र दिले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com