

पुणे ः भारत सरकारने जीएम सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर अर्जेंटिना आणि बांगलादेशातून सोयापेंडची आयात झाली आहे. अर्जेंटिना महत्त्वाचा सोयाबीन उत्पादक देश असला तरी बांगलादेशात मात्र नगण्य उत्पादन असूनही इतर देशांतून आयात झालेली पेंड भारताला निर्यात केली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत अर्जेंटिनातून जवळपास तीन लाख टन, तर बांगलादेशातून ९१ हजार टन सोयापेंड भारताला निर्यात झाली आहे. केंद्र सरकारने देशात तुटवडा निर्माण होऊन सोयापेंडचे दर वाढल्यानंतर १२ लाख टन आयातीला परवानगी दिली होती. त्यामुळे देशात सोयापेंड आयात वाढली आहे. भारताला सोयापेंड निर्यात करणारा अर्जेंटिना महत्त्वाचा देश ठरतो आहे. ऑक्टोबरदरम्यान देशात अर्जेंटिनातून १ लाख ६१ हजार ७० टन सोयापेंडची आयात झाली आहे. तर बांगलादेशातून ४९ हजार ४६० टन सोयापेंडची आयात झाली. बांगलादेशात तेलबियांचे उत्पादन नगण्य आहे. मात्र अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून येथे सोयाबीन आयात करून प्रक्रिया केली जाते. भारतात दर वाढल्याने बांगलादेशातून सोयापेंडची निर्यात झाली. मात्र बांगलादेशात सोयापेंडचे दर वाढल्याने निर्यातीवर बंदी घातली आहे. व्हिएतनाममधून भारतात ३४ हजार ८१९ टन सोयापेंड भारतात दाखल झाली. थाडलंडमधून २३ हजार २४० टन पेंडची आयात झाली. तर ब्राझीलमधून २० हजार ६६५ टन सोयापेंड भारतात आयात झाली आहे. नायजेरियातून १ हजार १०६ टन आणि अमेरिकेतून अकराशे टन सोयापेंड भारतात आयात झाली आहे.
देशात झालेली आयात सप्टेंबरदरम्यान देशात अर्जेंटिनातून १ लाख ४० हजार २१५ टन सोयापेंडची आयात झाली. तर बांगलादेशातून ४१ हजार ३२० टन, बेनिनमधून ५ हजार ९७० टन, चीनमधून ४२ टन, इथोपियातून १ हजार ५९३ टन, इंडोनेशियातून ११ हजार ५०० टन, नेपाळमधून १० हजार ३८८ टन, नायजेरियातून २ हजार ७४९ फिलिपिन्समधून १२ हजार ५५२ टन, सिंगापूरहून ७ हजार ९० टन स्वित्झर्लंडमधून १२ हजार ३०६ टन, व्हिएतनाममधून ३१ हजार ३९० टन, संयुक्त अरब अमिरातीतून २ हजार २४० टन सोयापेंड आयात झाली. दुसरीकडून मागवून भारताला निर्यात भारतात आयात झालेल्या सोयापेंडीचे वैशिष्ट्य हे आहे, की ज्या देशांत तेलबियांचे उत्पादन होत नाही, किंवा नगण्य उत्पादन होते त्या देशांतून सोयापेंड आयात मोठ्या प्रमाणात झाली आहे. हे देश आपली मागणी पूर्ण करण्यासाठी निर्यातदार देशांतून आयात करतात आणि शिल्लक माल दुसऱ्या देशांना पाठवितात. सोयाबीन निर्यातीत अर्जेंटिना, ब्राझील, अमेरिका, भारत आणि कॅनडा हे देश आघाडीवर आहेत. तर चीन हा सोयाबीनचा प्रमुख आयातदार आणि प्रक्रिया करणारा देश आहे. चीनमध्ये सरासरी १० ते १२ कोटी टन सोयाबीनची आयात होते आणि प्रक्रिया केली जाते. आपली गरज पूर्ण झाल्यानंतर चीन दुसऱ्या देशांना पेंड निर्यात करतो.
प्रतिक्रिया
देशात सोयापेंडचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर सरकारने आयातीला परवानगी दिल्याने आयातदारांनी करार केले. ज्या लहान मोठ्या कंपन्या होत्या त्यांनी शेजारच्या बांगलादेशातून सोयापेंडची आयात केली. मुख्यत: ईशान्य भारतात बांगलादेशातून सोयापेंडची आयात झाली. मात्र तेथील सरकारने आता बंदी घातल्याने आयात थांबली आहे. तर मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अर्जेंटिनातून मोठ्या प्रमाणात आयात केली. अर्जेंटिनातून जास्त प्रमाणात आयात करणेच परवडत असल्याने पुढील काळात मोठ्या कंपन्याच आयात करतील. - राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक, लातूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.