

नगर : नगर जिल्ह्यात खरिपाची ६० टक्के पेरणी झाली आहे. पाऊस नसल्याने अजूनही अनेक ठिकाणी पेरणी करण्यास अडचण निर्माण झाली आहे. पावसाअभावीच कापसाची लागवडही रखडली आहे. शिवाय झालेली पेरणी व कापसाचे पीक पावसाअभावी अडचणीत आले आहे. त्यामुळे पेरणी करणारे आणि न करणारेही शेतकरी संकटात आहेत. नगर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ४ लाख ४७ हजार ९०४ हेक्टर क्षेत्र आहे. मात्र गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे खरिपाचे क्षेत्र वाढले होते. त्याच धर्तीवर यंदाही जवळपास पावणे सात लाख हेक्टरवर खरिपात पेरणी होईल, असा अंदाज बांधून कृषी विभागाने नियोजन केले होते. मात्र यंदा पेरणी, कापूस लागवडीला फारसा वेग आला नाही. जून सरला तरी अजूनही जिल्ह्यात पुरेसा पाऊस नाही. आतापर्यंत २ लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही पेरणी ६० टक्के आहे. आतापर्यंत मुग व उडदाने सरासरी ओलांडली आहे. तुरीची १३५ टक्के तर उडदाची ३०६ टक्के म्हणजे सरासरीच्या तिप्पट पेरणी झाल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. अजूनही अनेक भागात पावसाअभावी पेरणी, कापूस लागवड रखडली आहे. तर जेथे पेरणी झाली तेथेही पीक सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जामखेड, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता या तालुक्यात पेरणीचे प्रमाण नगण्य आहे.
पेरणी झालेले क्षेत्र (कंसात सरासरी क्षेत्र)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.