Green chillies flourish in Akola
Green chillies flourish in Akola

अकोल्यात हिरवी मिरची तेजीत

अकोला ः गेल्या महिनाभरापासून हिरव्या मिरचीच्या दरात तेजी सुरु झाली आहे. सध्याही बाजारात किमान ६० रुपयांपासून तर ७५ रुपयांपर्यंत प्रतिकिलोला ठोक भाव मिळत आहे. यामुळे मिरची उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

अकोला ः गेल्या महिनाभरापासून हिरव्या मिरचीच्या दरात तेजी सुरु झाली आहे. सध्याही बाजारात किमान ६० रुपयांपासून तर ७५ रुपयांपर्यंत प्रतिकिलोला ठोक भाव मिळत आहे. यामुळे मिरची उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मागील दोन-तीन वर्षांत मिरची उत्पादकांना दर न मिळाल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला. दोन महिन्यांपूर्वी आलेला अवकाळी पाऊस व वातावरण बदलाने अनेकांच्या मिरची पिकाचे नुकसान झाले. या तडाख्यातून ज्यांचे पीक सावरले, अशा शेतकऱ्यांना आता चांगला दर मिळत आहे.

गेल्या महिना-दीड महिन्यापासून येथील बाजारात मिरचीला सातत्याने चांगला दर मिळत आहे. सध्या किमान ६० रुपयांपासून तर ७५ रुपयांपर्यंत मिरचीला प्रतिकिलोला दर मिळत आहे. यामुळे मिरचीची किरकोळ विक्री थेट १०० रुपयांपर्यंत पोचली आहे.  मिरचीच्या प्लॉटचे झालेले नुकसान लक्षात घेता उत्पादन कमी आहे. शिवाय, उन्हाळ्याच्या काळात मिरचीची आवकही कमी होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता मिरचीला चांगला दर मिळत आहे, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

सध्या जिल्ह्यातील तेल्हारा भागातून आणि मराठवाड्यातून ‘जी फोर’ या वाणाची आवक सुरु आहे. आगामी काही दिवस मिरचीचा हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. काही शेतकरी जागेवरच ६० रुपयांनी मिरचीची विक्री करीत आहेत. हीच मिरची किरकोळ बाजारात ९० ते १०० रुपये प्रतिकिलोने ग्राहकांना खावी लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com