

मुंबई : केंद्र सरकारने केलेले शेतकरीविरोधी कायदे तत्काळ मागे घ्यावेत, अशी विनंती करणारे पत्र विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. केंद्राने जर हे कायदे मागे घेतले नाहीत, तर संवैधानिक पदावर असूनही आपल्याला शेतकरी या नात्याने आंदोलनात सहभागी व्हावे लागेल, असे नाना पटोले यांनी या पत्रात म्हटले आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलनाने जोर धरला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. नाना पटोले यांनीही शेतकऱ्यांच्या मागणीचे समर्थन केले आहे. त्यासाठी त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. मी शेतकरी या नात्याने पत्र लिहीत आहे. शेतकरी आपल्या अधिकारांची लढाई लढतो आहे. आपण बनविलेला कायदा हा शेतकरीविरोधी आहे. त्याचाच विरोध करण्यासाठी दिल्लीतील कडाक्याची थंडी आणि कोरोनाची पर्वा न करता देशातील शेतकरी एकवटला आहे. शेतकऱ्यांप्रती आपल्याला वाटत असलेली चिंता पाहता हा कायदा आपण त्वरित मागे घ्याल अशी आशा नाना पटोले यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.