‘किसान रेल्वे’द्वारे एका दिवशी पंधरा हजार टन शेतीमालाची वाहतूक

नांदेड : कोरोनामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाल्याने रेल्वेच्या महसुलावर निर्बंध आले होते. त्यातून मार्ग काढून नांदेड रेल्वे विभागाने किसान रेल्वे तसेच मालगाड्यांच्या माध्यमातून महसुल मिळवला आहे.
Fifteen thousand tons of agricultural produce transported in one day by ‘Kisan Railway’
Fifteen thousand tons of agricultural produce transported in one day by ‘Kisan Railway’
Published on: 
Updated on: 

नांदेड : कोरोनामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाल्याने रेल्वेच्या महसुलावर निर्बंध आले होते. त्यातून मार्ग काढून नांदेड रेल्वे विभागाने किसान रेल्वे तसेच मालगाड्यांच्या माध्यमातून महसुल मिळवला आहे. दक्षीण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून शनिवारी (ता.१२) एकाच दिवशी सहा मालगाड्या देशभरात रवाना करून १५ हजार १९५ टन शेतमालाची वाहतूक केली. त्यातून रेल्वेला २ कोटी ३३ लाख रुपयांचा महसूल मिळाला.

नांदेड रेल्वे विभागातून शनिवारी पहिल्यांदाच एकाच दिवशी सहा रेक मालगाड्या रवाना झाल्या आहेत. त्यातून देशातील विविध भागात १५ हजार १९५ टन शेतमाल रवाना झाला. ज्यातून रेल्वेला २ कोटी ३३ कोटी रुपये महसूल मिळाला. नांदेड विभागात स्थापन केलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट टीमच्या सततच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले. या यशाबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी बिझनेस डेव्हलपमेंट टीमचे अभिनंदन केले. 

शनिवारी औरंगाबाद येथून दोन वर्षांच्या अवधीनंतर आसाम राज्यातील गुवाहाटी जवळ अझारा येथे साखर पाठविण्यात आली. ज्यात दोन जार ६५८ टन साखर पाठविण्यात आली. आदिलाबाद येथून प्रथमच तमिळनाडू राज्यातील तीरुपूर आणि इरोड येथे ज्वारी पाठविण्यात आली. या रेकमधून दोन हजार ६६७ टन ज्वारी पाठविण्यात आली. दौलताबाद येथून जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनल येथे कंटेनरमधून एक हजार १८४ टन माल वाहतूक करण्यात आली. नगरसोल येथून बिहार राज्यातील फातुवा येथे तीन हजार ३६४ टन कांदा पाठविण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com